विठ्ठल भक्ताकडून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस मौल्यवान सुवर्ण अर्पण

विठ्ठल भक्ताकडून    श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस मौल्यवान सुवर्ण अर्पण

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) संभाजीनगर येथील भाविक कहूबाई पांडुरंग सोनवणे यांनी श्री विठ्ठल चरणी स्नेहपूर्वक मौल्यवान सुवर्ण अर्पण केले आहे.

सोनवणे परिवाराने सोने तुळशी माळ अर्पण केली असून तिचे वजन १०.००० मिली ग्रॅम इतके असून किंमत रु. १,१४,०००/- इतकी आहे. तसेच सोने तुळशी हार अर्पण केला असून त्याचे वजन १३.०३० मिली ग्रॅम इतके असून किंमत रु. १,४४,०००/- इतकी झाली आहे.

या भाविकांचा सत्कार मा. सदस्य ह.भ. प. जळगावकर महाराज तसेच सदस्य नडगिरी यांच्या हस्ते करण्यात आला.