करकंब येथील जुगार अड्यावर पोलिसांची मोठी कारवाई ◼️ सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, यांचे पथकाची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई लाखोंचा मुदद्देमाल जप्त " ◼️ करकंब पोलीस कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्मी दर्शन होत असल्याने अवैद्य धंदेवाल्यांकडे दुर्लक्ष
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) दि. ११/१०/२०२५ रोजी सोमबार पेठ, रोजा गल्ली, करकंब येथे सिमेंट पत्राचे शेडमध्ये इसम नामे शहाजी वसंत शिंदे रा. करकंब ता. पंढरपूर व इसम नामे विजय बाबुराव वंजारी रा. करकंब ता. पंढरपूर हे अवैधरीत्या जुगार अडदा चालवत असताना तसेच इसम नामे विजय बाबुराव बंजारी रा. करकंब ता. पंढरपूर हा पत्राशेडच्या जवळच्या खोलीत त्याचे ताब्यात बेकायदेशीररीत्या देशी दारु बाळगलेल्या परिस्थितीत असलेबाबत गोपनीय माहिती मिळालेने सदर ठिकाणी पोलीस पथक यांनी जावून छापा कारवाई केली असता
मौजे सोमवार पेठ, रोजा गल्ली, करकंब येथे सिमेंट पत्राचे शेटमध्ये हसम नामे शहाजी वसंत शिंदे रा. करकंब ता.पंढरपूर हा १४ इसमा सोबत ५२ पानी पत्याच्या जुगारावर पैसे लावून खेळत असताना मिळून आलेले आहेत. इसम नामे बिजय बाबुराव वंजारी हा पत्राशेडच्या जवळच्या खोलीत त्याचे ताब्यात बेकायदेशीर देशी दारु हि जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आलेले आहे.
मौजे सोमबार पेठ, रोजा गल्ली, करकंब येथे सिमेंट पत्राचे शेडमध्ये पत्ते खेळण्याकरीता आलेल्या इसमांकडे दुचाकी वाहने, मोबाईल, रोख रक्कम, ५२ पानी पत्याचे डाब, त्यामध्ये १) रोख रक्कम ४१,४३०/-रुपये, २) १४ मोबाईल फोन १,२०,०००/- रुपये ३) ७ मोटारसायकल ३,९०,००० ४) देशी दारु ७२,१९२/- रुपये असा एकूण ६.२३,६२२/- रुपये असा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याबाबत करकंब पोलीस ठाणेस बरील १५ इसमांबर महाराष्ट्र जुगार फायदा कलम ४ व ५ प्रमाणे व हसम नामे विजय बाबुराव बंजारी रा. करकंब ता. पंढरपूर याचेबर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कामगीरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण,अपर पोलीस अधिक्षक, प्रितम यावलकर,सहा पोलीस अधिक्षक, प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, पोह/निलेश रोंगे, पोह/सातब, पोकों/हुलजंती, पोकों/लोंढे, पोकों/कांबळे, पोकों/अजित जाधव, मपोकों/माने यांनी पार पाडलेली आहे.