श्री विठ्ठल -रुक्मिणी मातेस भाविकाकडून 04 लाख 77 हजार किंमतीचे चांदी वस्तू अर्पण.

श्री विठ्ठल -रुक्मिणी मातेस भाविकाकडून 04 लाख 77 हजार किंमतीचे चांदी वस्तू अर्पण.

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):- मौजे हिंगणी तालुका करमाळा येथील भाविक सौ. कमल मोहन बाबर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस 5 किलो 425 ग्रॅम वजनाच्या चांदी वस्तू अर्पण केले आहेत. त्याची किंमत रू.477000/- इतकी आहे.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने सौ.बाबर यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.

सदरची देणगी कै. कानून मोहन बाबर यांच्या स्मरणार्थ मिळाली असून, या चांदी वस्तूचे वर्णन गरुड व हनुमंत पताका आहे. विविध सण-उत्सव व यात्रा कालावधीत श्रींच्या मिरवणुकी वेळी या चांदीच्या पताकाचा वापर करण्यात येणार आहे. सौ. बाबर यांच्या मुलाचे नुकतेच अपघाती निधन झाले आहे. आपल्या मुलाच्या संपत्तीतील काही हिस्स्यातून व मुलाची आठवण राहावी म्हणून पांडुरंग चरणी आईने दान दिले आहे. त्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या निस्सिम भक्त असून मागील अनेक वर्षापासून आषाढी व कार्तिकी वारी करीत आहेत.