पंचायत समिती, पंढरपूर तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा उत्साहात संपन्न..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) जिल्हा परिषद सेस योजनेतून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी व प्राथमिक शिक्षक यांच्यामध्ये विविध खेळांची व क्रीडा प्रकाराची माहिती व्हावी यासाठी तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी असे दोन गट पाडून पंढरपूर तालुक्याच्या क्रीडा स्पर्धा दिनांक 14 व 15 डिसेंबर 2023 रोजी राहुल गांधी माध्यमिक विद्यालय कोर्टी येथे संपन्न झाल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन पंढरपूर ( ग्रामीण ) विभागाचे पी. एस. आय मुजावर यांच्या शुभहस्ते व शांतिनिकेतन गुरुकुल चे अध्यक्ष दत्तात्रय कोंडलकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. पंचायत समिती पंढरपूरचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे साहेब यांच्या प्रेरणेने व पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन पार पडले. यावेळी स्पर्धेचे नियोजन ह. जा. भोसले, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक नागनाथ क्षीरसागर गुरुजी , अण्णासाहेब पवार यांनी केले स्पर्धेचे सुत्रसंचलन शरदचंद्र चट्टे व श्री समाधान काळे यांनी केले. यावेळी सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. क्रीडा पंच म्हणून लवटे सर,आबासाहेब नवले, शिवाजी दांडगे, पांडुरंग कुंभार, अविनाश कदम, तानाजी नाईकनवरे, पिंटू खुळे, कुंदुमिनी सरदार मॅडम, धनाजी जाधव, ज्ञानेश्वर मोरे, दत्ता माने, देवकते सर, राहुल आर्वे, संदीप खेडकर यांनी काम केले तर राजेंद्र कटकधोंड, धनाजी देशमुख, कल्याण कुंभार, आप्पासाहेब माळी यांनी गुणलेखकाचे काम केले.
तालुकास्तरावर सांघिक प्रथम व द्वितीय व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या सर्व संघास व खेळाडूस ट्रॉफी व मेडल, सर्टिफिकेट देण्यात आली. यावेळी पंढरपूर महसूल नायब तहसीलदार पंडीत कोळी , महिला व बालकल्याणचे कदम व धनंजय जगताप वरिष्ठ लिपिक उपस्थित होते. कार्यक्रमास यावेळी जिल्हा सोसायटीचे चेअरमन रामभाऊ यादव , व्हाईस चेअरमन श्रीमती राणी व्हनमाणे मॅडम, ज्योतीराम बोंगे, संजय हेगडे, संदीप खेडकर व सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. राहुल गांधी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका पांढरे मॅडम व सर्व सहकारी शिक्षकांनी सहकार्य केले.
पंढरपूर तालुकास्तरीय क्रीडा निकाल
विजयी संघ - क्रीडा प्रकार लहान गट १ ली ते ५ वी मोठा गट ६ वी ते ८ वी मुले मुली मुले मुली कबड्डी जि.प.प्रा.शा. मुंढेवाडी (चळे) जि.प.प्रा.शा.आव्हे (पटकुरोली) जि.प.प्रा.शा.वाखरी (वाखरी ) जि.प.प्रा.शा.शिरगांव (सिद्धेवाडी )
खो-खो जि.प.प्रा.शा.देवडे (पटकुरोली) जि.प.प्रा.शा. मानेवस्ती (उंबरे ) जि.प.प्रा.शा.तपकिरी शेटफळ (त. .शेटफळ) जि.प.प्रा.शा.बोहाळी (खर्डी) लंगडी जि.प.प्रा.शा.
जाधववाडी (पांढरेवाडी ) जि.प.प्रा.शा. जाधववाडी (पांढरेवाडी ) जि.प.प्रा.शा. मुंढेवाडी (चळे) जि.प.प्रा.शा.रांझणी (चळे)
100 मी धावणे मयूर गणेश करपे सुस्ते (तुंगत) स्वराली बोचरे मुली नं २ करकंब (करकंब ) अमोल किसन माने त. .शेटफळ (त. .शेटफळ) श्रुती संजय चौधरी फुलचिंचोली (फुलचिंचोली ) 200 मी धावणे विराज नवनाथ खरात शारदानगर (पुळूज) उर्मिला सदाशिव जाधव वाखरी (वाखरी ) अभिषेक यशवंत राय वाखरी (वाखरी ) प्राजक्ता पिंटू गायकवाड फुलचिंचोली (फुलचिंचोली ) बुद्धिबळ मल्हारराव पांडुरंग शिंदे बाभूळगांव (बाभूळगांव) अनन्या विलास चव्हाण पिराची कुरोली ( भंडीशेगांव ) शंभूराजे शिवाजी नरसाळे जळोंली (उंबरे ) सुप्रिया अंकुश शिंगटे करोळे (उंबरे )