श्री. रुक्मिणीमातेस धाराशिव येथील भाविकाकडून चांदीचा टोप अर्पण.
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) आज सोमवार दिनांक१८ डिसेंबर, २०२३ रोजी धाराशिव येथील भाविक अनुराधा हरिश्चंद्र कासार यांनी श्री. रुक्मिणी मातेस अंदाजे एक किलो वजनाचा चांदीचा टोप अर्पण केला आहे. त्याची अंदाजित किंमत १.०० लक्ष असून, सदर भाविकाचा मंदिर समितीच्या वतीने श्रींची प्रतिमा व मानाचे उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी दानशूर देणगीदार भाविकांचे कुटुंब व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते. सदर भाविकांनी यापूर्वी सन २०२२ मध्ये श्री .विठ्ठलास देखील चांदीचा टोप अर्पण केला होता.
श्रीस सोने-चांदी च्या वस्तू अर्पण करायच्या असल्यास, मंदिर समितीमध्ये त्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला असून, संबंधित भाविकांकडून प्राप्त होणाऱ्या वस्तूची अधिकृत सराफामार्फत तपासणी व मूल्यांकन करून संगणकीकृत पावती देण्यात येते.