सुप्रिया सुळेंनी राखी बांधलेल्या अभिजीत पाटलांनी घेतली भाजप नेत्याची भेट.....शरद पवार गट राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी रक्षाबंधनदिनी राखी बांधली होती.पाटील हे पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. मात्र, त्याच अभिजित पाटील यांनी काल सायंकाळीच भाजप नेते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतल्याने पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघातील कार्यकर्ते मध्ये खळबळ उडाली आहे. मंगळवेढा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अगोदरच अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगोला दौऱ्यावर जात असताना मंगळवेढा येथे अभिजीत पाटील यांनी मंगळवेढ्यातील स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतंत्र स्वागत पर सत्काराचे नियोजन केल्यामुळे पाटील यांनी एक कलमी कार्यक्रम हाती घेतला होता त्यामुळे यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
अभिजीत पाटील हे पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरही त्यांनी शरद पवार गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाटील हे पंढरपूरचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सुरू असतानाच आज अचानक पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजीत पाटील यांना बुधवारी दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांनी राखी बांधून राजकीय इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी अभिजीत पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हेदेखील उपस्थित होते.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेली ही भेट राजकीय नव्हती. पंढरपूर मतदार संघात जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत, यासाठी आणि इतर प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली, असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
धाराशिव येथील साखर कारखान्यास अभिजीत पाटील यांची सोडचिट्टी ? चेअरमन पाटील हे धाराशीव युनिटमधील सर्व कारखान्या संबंधित टप्प्याटप्प्याने सोडचिठ्ठी घेण्याची जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दिवसभर होत होती त्यानंतर आता फक्त विठ्ठल वरच लक्ष केंद्रित करणार.