आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या खात्याचा अजब कारभार, मनीषा आव्हाळे यांनी दिले चौकशीचे आदेश..

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या खात्याचा अजब कारभार, मनीषा आव्हाळे यांनी दिले चौकशीचे आदेश..

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर (पंढरी नगरी न्यूज) जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाने विविध छपाईचे टेंडर लातूरच्या ममता जाहिरात एजन्सीला मंजूर केले आहे. त्यामुळे आता शंभर पोस्टरसाठी झेडपीचे कर्मचारी लातूरला जाणार का? असा सवाल खुद्द सीईओ मनीषा आव्हाळे यांना पडला आहे. झेडपीच्या आरोग्य विभागाने विविध छपाईचे टेंडर लातूरच्या ममता जाहिरात एजन्सीला मंजूर केले आहे. त्यामुळे आता शंभर पोस्टरसाठी झेडपीचे कर्मचारी लातूरला जाणार का? असा सवाल खुद्द सीईओ मनीषा आव्हाळे यांना पडला आहे.

झेडपीच्या आरोग्य विभागाने एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विविध छपाई कामासाठी 57 लाखाची ई निविदा जाहीर केली होती. यात आरोग्य आय.ई .सी.छपाई व प्रिंटींग पुरवठ्याचे काम राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अंतर्गत विविध योजना निहाय व विभागनिहाय सन २०२३-२४ करीता पोस्टर्स, बॅनर्स, स्टिकर्स, पॉम्पेल्टस, हस्तपत्रिका, रजिस्टर, डिजीटल बॅनर्स, फ्लेक्स, होर्डिंग्ज, फॉर्म आदी प्रकारची छपाई व प्रिंटींग पुरवठादारकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे ई निवीदा जाहीर केली होती. यासाठी अंदाजित निविदा 56 लाख 62 हजाराची असल्याचे नमूद करण्यात आले. निविदेचे कामकाज एका कंत्राटी कर्मचाऱ्याने पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व तो कंत्राटी कर्मचारी यांनी लातूरच्या संस्थेला निविदा मंजूर केली. आरोग्य अधिकाऱ्यांनी लातूरच्या जाहीरात एजन्सीला दिलेल्या कंत्राट्याच्या फाईलवर सीईओ आव्हाळे यांनी सही केली. आता या मंजूर ठेक्याबाबत तक्रार आली आहे. त्यामुळे सीईओ आव्हाळे यांना या प्रकरणात काहीतरी काळे- बेरे असल्याचा संशय वाटला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. मुख्य लेखा वित्त विभागाचा अभिप्राय घेतल्यानंतर एकदा मंजूर झालेली निविदा पुन्हा रद्द करता येत नसल्याचे सांगण्यात आले. सीईओ आव्हाळे यांनी ही निविदा कायम केल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता कर्मचाऱ्यांना 100 पोस्टर साठी लातूरला जायचे का ? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे ही निविदा मंजूर करताना काहीतरी गडबडी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सोलापुरात छपाईची यंत्रणा नाही का ? छोट्या छोट्या कामासाठी लातूरच्या जाहीरात एजन्सीला सोलापुरातील छपाईचा ठेका परवडतो का असा आता सवाल उपस्थित केला जात आहे.