सिताराम महाराज साखर कारखाना कार्यस्थळावर सुयोग गायकवाड यांचा सत्कार संपन्न...!

सिताराम महाराज साखर कारखाना कार्यस्थळावर सुयोग गायकवाड यांचा  सत्कार संपन्न...!

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्यूज ) :  पंढरपूर तालुक्यातील सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी. कार्यस्थळावर  कारखान्याचे संचालक  सुयोग रविराज गायकवाड यांची उच्च शिक्षणासाठी लंडन येथील बँगोर विद्यापीठात निवड झालेबद्दल   त्यानिमित्ताने कारखान्याच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी  धनश्री परिवार व सिताराम परिवारातर्फे मा. सुयोग रविराज गायकवाड यांचा सत्कार ह.ब.प.प्रभाकर बोधले महाराज,  प्रा ,शिवाजीराव काळुंगे, चेअरमन- शोभाताई काळुंगे, तसेच सिताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड - काळुंगे, सांगोला सुतगीरणीचे चेअरमन - नानासाहेब लिगाडे, उद्योजक केदार रावसाहेब,  यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जनरल मॅनेजर हनुमंत पाटील. मुख्य शेती अधिकारी पी.जी.शिंदे, शेती अधिकारी डी. एस. रोकडे, टेक्निकल जनरल मॅनेजर पाटील, कार्यालय सुप्रिडेंट डी. एम .सुतार, चिप केमिस्ट इंजिनिअर नागणे, सुरक्षा अधिकारी माळी. इत्यादी कारखान्यातील सर्व विभाग प्रमुख कर्मचारी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.