पंढरपुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजमाता जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा..
---------------------------------------------------------------------------------
जिजाऊ स्मारक उभा करण्यासाठी सरकारकडे ५ कोटी रू. निधीची पुणे विभागीय संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरणराज घाडगे यांची मागणी
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर शहर व तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या ४२५ व्या जयंतीनिमित्त जिजाऊ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस सौ.ज्योतीताई बागल (मुख्याध्यापिका यशकिर्ती विद्यालय) ,.प्रणिताताई भालके, प्रियांका डोंगरे-घाडगे,.आशा मोळक यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.
यावेळी किरणराज घाडगे, स्वागत कदम, संदिप मांडवे, रामा गायकवाड, स्वप्निल कदम, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, अमर बाबर, गोपी वाडदेकर, पुरूषोत्तम देशमुख, शेखर आटकळे, बंडू काका शिंदे, सोपान काका देशमुख, शेखर भोसले, विनोद लटके, संभाजी देवकर, सत्यम धुमाळ, बंटी वाघ, आकाश पवार, शहाजी शिंदे, सचिन कोल्हे, लक्ष्मण ताड, सुरज पावले, तानाजी मोरे, सुरज गंगथडे, इ.मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते,
यावेळी किरणराज घाडगे यांनी जिजाऊ स्मारक उभा करण्यासाठी निधी देण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, नगरपरिषद व प्रशासकानी तात्काळ प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला पाहिजे,५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या स्मारकामध्ये जिजाऊंच्या जीवनावरील भिंती शिल्प, भव्य वाचनालय, जिजाऊ ध्यान हॉल, बरच काही यामध्ये असणार आहे यावेळी शहर व तालुक्यातून संभाजी ब्रिगेड .जिजाऊ ब्रिगेड .मराठा सेवा संघ इत्यादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने जिजाऊ जन्मोत्सवास उपस्थित होते.