हैद्राबाद येथील भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस 8.36 लक्ष किंमतीचे सोने भेटवस्तू अर्पण
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) – श्रीमती विजया नायडू, हैद्राबाद या दानशुर भाविकाने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांना 130 ग्रॅम वजनाची सोने भेट वस्तू अर्पण केली आहे. त्याची किंमत 8 लक्ष 36 हजार होत आहे. या दानशुर भाविकांचा व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या शुभहस्ते उपरणे व दैनंदिनी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी श्रीमती नायडू यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
