तुळजापूर येथील नवोदय विद्यालयात जागरूक नागरिक कार्यक्रम संपन्न..

तुळजापूर येथील नवोदय  विद्यालयात  जागरूक नागरिक कार्यक्रम संपन्न..

---------------------------------------------------------------------------------

तुळजापूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) तुळजापूर तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालय येथे शुक्रवार दिनांक १७/०२/२०२३  रोजी सकाळी ८.०० वाजता जागरूक नागरिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन करण्यासाठी रामकृष्ण परमहंस नवी दिल्ली द्वारे चालविल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रमुख  हरीश ध्यानी व श्रीमती गीता ध्यानी आले होते.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये अंगी असीम स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती असतात परंतु त्याला योग्य विकास होऊ   शकत नाही तर त्यासाठी ध्यान, एकाग्रता  कशी करावी ,आत्मनिर्भर कसे बनवावे, एक चांगला नागरिक कसे बणावे, समाजातील चांगले वाईट याचे आकलन कशा प्रकारे करावे, सत्याचा शोध कसा घ्यावा, स्वतःचा विकास कसा करावा, श्रद्धा कशी विकसित करावी, सहासी कसे बनवावे  यासाठी त्यांनी मार्गदर्शन करून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा यासाठी अनमोल असे त्यांनी मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम २०१७ पासून संपूर्ण भारतात  राबविला जात आहे. हा कार्यक्रम विशेष करून  सातवी, आठवी, नववी या वर्गासाठी आहे.  विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. व्ही .व्ही. कुलकर्णी ,एन .पी .पवार , सुजाता कराड ,डी. एस .देशमुख ,  एच. जी .जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले .तसेच याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.