पंढरपूरात नवरात्र महोत्सव श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान, ◼️ मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सदस्य महोदय, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत व लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण ◼️ पारंपारिक कार्यक्रमांसह महिला भजनी मंडळाच्या भजन सेवेने मंदिरात भक्तीमय वातावरण,

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात होत आहे. या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली    

रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच श्री विठ्ठलास देखील नेहमी प्रमाणे सोने मुकुट, कौस्तुक मणी, मोत्याचा तुरा, नाम, दंडपेठ्या मोठा जोड, हि-यांचा कंगण जोड, एक पदरी मोत्याची कंठी, लहान-मोठा शिरपेच, मत्सजोड, हायकोल, मोहन माळ, पुतळ्यांची व मोहरांची माळ, एकदाणी, तोडेजोड, तुळशी माळ, हायकोल इत्यादी पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत.   

तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आला आहे. 

प्रतिवर्षी प्रमाणे रूक्मिणी मातेस पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. सदरचे अलंकार पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच सभामंडपातील पारंपारिक कार्यक्रमा शिवाय महिला भजनी मंडळाच्या भजन सेवेने मंदिरात भक्तीमय वातावरण झालेले आहे. 

नवरात्र उत्सवातील भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन श्री विठ्ठल -रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.