पंढरपूर " भाजपचे" शहर अध्यक्षाच्या अवैद्य व्यवसाय जुगारअड्यावर पोलीस प्रशासनाची धाडशी कारवाई ◼️ सहा. पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, यांची जुगार अड्ड्यावर कारवाई ५ लाख ४३ हजार ३०० रू.चा मुदद्देमाल जप्त".. ◼️ कमळन बाईच्या पंढरपूर शहर अध्यक्षाचे राजरोसपणे चालणारे काळेधंदे पोलिसांनी मांडले चव्हाट्यावर ..

पंढरपूर " भाजपचे" शहर अध्यक्षाच्या अवैद्य व्यवसाय जुगारअड्यावर पोलीस प्रशासनाची   धाडशी  कारवाई  ◼️ सहा. पोलीस अधीक्षक  प्रशांत डगळे,  यांची जुगार अड्ड्यावर कारवाई ५ लाख ४३ हजार ३०० रू.चा मुदद्देमाल जप्त"..  ◼️ कमळन बाईच्या  पंढरपूर शहर अध्यक्षाचे  राजरोसपणे चालणारे काळेधंदे पोलिसांनी  मांडले चव्हाट्यावर ..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर शहर पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी ,दि.२२ रोजी सहा. पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मंदिरा जवळ, डोंबे गल्ली अवैध जुगार चालु असलेबाबत माहिती मिळाल्याने आम्ही सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर व पोसई/महादेव पिसाळ असे पंढरपूर शहर पोलीस ठाणेस दि. २२/०९/२०२५ रोजी ठाणे दैनंदिनीस नोंद ०२/२०२५ नोंद करुन आमचे सह ०२ पोलीस पथकाचे सोबत पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मंदिरा जवळ, डोंबे गल्ली येथे एका खोलीत अवैधरीत्या जुगार खेळत असलेल्या ठिकाणी छापा कारवाई केली आहे.

पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मंदिरा जवळ, डोंबे गल्ली येथील रोहित उर्फ लाला पानकर याचे घराचे शेजारी असलेल्या बोळातून आत गेल्यावर एका खोलीत १३ इसम हे ५२ पत्याच्या डावावर पैशाची पैज लावून जुगार खेळत असताना दिसले. रोहित उर्फ लाला पानकर हा परिचारक गटाचा खंदा समर्थक तसेच पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष हा पदाधिकारी अवैद्य जुगार अड्डा चालवत असल्याचे माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी जुगार खेळत असलेली घरजागा ही शहराध्यक्ष पानकर यांच्या मातोश्री लक्ष्मी पानकर यांच्या नावे असल्याचे बोलले जात आहे. सदर ठिकाणी ४२ इंची टि.व्ही वरती सी.सी.टी.व्ही. फुटेज निरीक्षणा करीता वापर करण्यात आलेला आहे तसेच खोलीमध्ये गादया खुडच्या जुगार खेळण्याचे इतर साहित्य होते. पोलीस पथकास सी.सी.टि.व्ही फुटेज मध्ये पाहून सदर स्वप्निल प्रकाश टमटम , विकास हनुमंत गायकवाड ,किरण माणिक धोत्रे, हर्षवर्धन बाळासाहेब तडसरे हे चारजणाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे इसमापैकी ०९ इसम तेथुन निखिल धोत्रे ,राहुल काळुंखे ,राजभाऊ मिस्त्री ,बाबू मांडवे हे चार आरोपी पळुन गेले. व ०४ इसम मिळून आले.

सदर खोलीमध्ये जुगार खेळण्याकरीता आलेल्या इसमांकडे दुचाकी वाहने, एक रिक्षा, रोख रक्कम, जुगार खेळण्याकरीता वापरात आणलेली रक्कम, जवळ बाळगलेले मोबाईल व ५२ पानी पत्याचे डाव त्यामध्ये १) रोख रक्कम १७,१८०/- २) दुचाकी वाहने किंमत रुपये ६५,०००/- ४) जुगार साहित्य किंमत रुपये हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याबाबत पंढरपुर शहर पोलीस ठाणेस १३ जुगार खेळणा-या इसमां विरुध्द् महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ कलम ४ व ५ प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर ५९७/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४,४५,०००/- ३) भ्रमणध्वनी संच (मोबाईल) किंमत रुपये १६,१२० असा एकुण ५,४३,३०० रुपये चा मुद्देमाल

सदरची कामगीरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक , सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोसई/महादेव पिसाळ, पोह/१८६ निलेश रोंगे, पोह/३५३ सुजित उबाळे, मपोहेकों/२८१ शितल राउत, पोना/१३८३ सिताराम चव्हाण यांनी पार पाडलेली आहे. देशात भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीच अशा अवैद्यव्यवसाय थाटले तर सर्वसामान्य जनतेचे काय ? हा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. नवरात्र महोत्सवाच्या काळात सुरू असलेल्या अवैद्य जुगार अड्ड्यावर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने छापा टाकून धाडशी

 कारवाई केल्याने शहरातील अवैद्य व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.