श्री विठ्ठल - रूक्मिणी मातेला सोन्याचा हार - ठुशी व चांदीची नाणी अर्पण,
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दैनिक,पंढरी नगरी न्यूज ):- श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिरे समितीस पुष्पा नाथा शिंदे या भाविकाने सोन्याचा हार व ठुशी तसेच मोरया कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपर्स, पुणे यांनी चांदीची नाणी अर्पण केल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

पुष्पा नाथा शिंदे ह्या छत्रपती संभाजी नगर येथील रहिवाशी असून, त्यांनी 6.9 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तीन पदरी हार व ठुशी श्री विठ्ठल- रूक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केली असून, त्याची अंदाजे किंमत 50 हजार होत आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिरे समितीच्या वतीने मंदिर समितीचे विभाग प्रमुख विनोद पाटील यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचा प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते.

याशिवाय, मोरया कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपर्स, पुणे यांनी 1100 ग्रॅम वजनाचे गणपतीची प्रतिमा असलेली चांदीची 11 नाणी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केली असून, त्याची अंदाजे किंमत 1 लक्ष होत आहे. त्याबद्दल मोरया कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपर्स, पुणे यांचेकडील रमेश येवले यांचा मंदिरे समितीच्या वतीने मंदिर समितीचे विभाग प्रमुख राजेंद्र घागरे यांनी मंदिर समितीची दैनंदिनी, दिनदर्शिका व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते.