सोलापूर येथील हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा...
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) हुतात्मा स्मारक, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, हुतात्मा सार्वजनिक वाचनालय, सोलापूर येथे स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथील ग्रंथालय निरीक्षक मा.प्रमोद पाटील यांचे शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
मी खूप भाग्यवान असल्याने मला हुतात्मा स्मारकात ध्वजवंदन करण्याचे भाग्य लाभले असे मत त्यांनी व्यक्त केले . स्वातंत्र्या करिता प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण त्यांनी केले. मा.जयंत आराध्ये यांनी हुतात्मा स्मारकाचा इतिहास उपस्थित वाचकाना सांगितला त्याचबरोबर वाचनालयाच्या कार्याचा आढावा घेतला. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ.वृशाली हजारे यांनी केले तर आभार सौ सारिका मोरे यांनी मांनले.
या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथील ग्रंथालय निरीक्षक मा. प्रमोद पाटील त्यांचे सहकारी संतोष देवळे यल्लाप्पा वाचनालयाचे उपाध्यक्ष ग्रंथ मित्र जयंत आराध्ये ग्रंथपाल वृषाली हजारे लिपिक सौ सारीका माडीकर सेवक गीतांजली गंभीरे संचालिका सौ सारिका मोरे, इकबाल शेख, निखिल पवार ,प्रतीक नकाते ,उमेश कनकी यांच्यासह बहुसंख्य वाचक उपस्थित होते.