मीनल साठे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर विधानसभा लढवा कार्यकर्त्यांचा आग्रह, मतदारच माझा पक्ष मतदाराशी चर्चा करूनच निर्णय घेणार-: नगराध्यक्षा मीनलताई साठे
------------------------------------------------------------------------------------
करकंब (दै.पंढरी नगरी न्यूज ) माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांचा पंढरपूर मतदार संघातील मतदार संपर्क गावभेटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने सुरुवात करण्यात आली असून साठे यांच्या संपर्क दौऱ्यास नागरिकाकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माढा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील सुरुवात नगराध्यक्षा मिनल साठे यांनी नुकतीच आज कान्हापुरी, उंबरे व करोळे येथील गावातील मतदाराशी संपर्क साधत त्यांनी अनेक अपूर्ण असलेल्या विषयावर नागरिकांची गाव भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली.

माढा - पंढरपूर मतदार संघातील नागरिकांचा विकास करणे हेच आमचे उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी नागरिकांशी बोलताना सांगितले तसेच 42 गावातील वाडी वस्ती वरील रस्त्याचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर- माढा मतदारसंघातून विधानसभेसाठी मी स्वतः उभे राहणार असून मतदार संघातील अनेक अपूर्ण राहिलेले प्रश्न सोडविण्याकरिता मला विधानसभेत पाठवण्यासाठी काम करण्याची संधी देवून आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी मी तुमच्या दारापर्यंत आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . तसेच मतदार संघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून कार्यकर्त्यांनी सांगितले तर शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारीवर लढण्यास मागेपुढे आपण बघणार नसल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, व्हा.चेअरमन सुधीर (तात्या) पाटील, संचालक राहुल (आण्णा ) पाटील, माढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, सभापती नाना साठे कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजारराव आसबे, व इतर मान्यवर यावेळी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.