एकनाथ शिंदे - फडणवीस सरकार पांढऱ्या पायाचे : शेतकरी युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजीत बागल

एकनाथ शिंदे - फडणवीस सरकार पांढऱ्या पायाचे : शेतकरी युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजीत बागल

---------------------------------------------------------------------------------------

शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी-
---------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( प्रतिनिधी )राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या महापुर परिस्थितीमुळे पिकाचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरीव मदत म्हणून सरसकट ५००००/- हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे राज्याचे प्रवक्ते रणजीत बागल यांनी केली आहे .

मागील विकास आघाडी सरकार उठवून टाकून शिंदे फडणीस सरकारने सत्तेत येऊन जेमतेम १००दिवस ही उलटले नाही तो पर्यंत सरकारमध्ये अंतर्गत कलह चालू आहे तर राज्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असल्याचे दिसत आहे .एकीकडे खाजगी पीक कंपन्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकार व प्रशासन यांच्या शेतकरी विरोधामुळे रास्त मदतीपासून वंचित राहिला आहे .आता शेती पिकाचे भाव वाढत चालले असतानाच सततच्या परतीच्या पावसामुळे शेतातील कापसाच्या वाती झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला सोयाबीन परतीच्या पावसाने वाहून झाल्याचे दिसत आहे दुर्दशा उघड्या डोळ्यांनी शेतकऱ्यांना पाहण्याचे दुर्दैवी वेळ आली आहे त्यामुळे कष्ट करणारा शेतकरी गरीब हैराण झाला आहे .

शासनाने त्वरित दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करून पिचलेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बागल यांनी आमच्या प्रतिनिधीकडे केले आहे .एकीकडे लंपी रोगाने शेतकऱ्यांच्या पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे .राज्यातील प्रत्येक गावागावात पावसाने थैमान घातले आहे .या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल या पावसाने वाहून नेले आहे राजात सर्वदूर पाऊस झाला असताना सरकार मात्र पंचनामेचे डोंग काढून सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केल्याचा आरोप बागल यांनी केला आहे.

सरकारने आता पिक विमा कंपनीचे चोचले पुरवणे बंद करून शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे अनेक महसूल मंडळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे एन .डी .आर. एफ च्या निकषात बसणारे होत असल्याने तात्काळ भरीव मदत द्यावी अन्यथा शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्य व रस्त्यावर उतरून दिलासादायक मदत मिळेपर्यंत निधर्मी सरकारला सळो की पळो करून सोडण्याचा इशारा प्रवक्ते रणजीत बागल यांनी दिला आहे.