तुळजापूर नवोदय विद्यालयात रमजान ईद व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी
------------------------------------------------------------------------------------
तुळजापूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालयात गुरुवार दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांचे द्वारा प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावरती विद्यालयातील वरिष्ठ अध्यापक सचिन खोब्रागडे, यश पाटील, हरी जाधव, दिलीप राऊत, डॉ. किशोर चौधरी, रविंद्र अलसेट, सुजाता कराड, सुषमा येलकर यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थित होता. याप्रसंगी विद्यालयातील मा. सार्थक गिरी या विद्यार्थ्याने महात्मा फुले यांच्या कार्यावरती आपले विचार व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. गंगाराम सिंह यांनी महात्मा फुले यांनी सर्वसामान्य लोकांसाठी व मुलींसाठी शिक्षणाची गंगोत्री घरोघरी कशी पोहोचवली हे सांगून केवळ शिक्षणामुळे भारताचे उच्च पद राष्ट्रपती पदापर्यंत महिला पोहोचल्या हे सांगून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षण क्षेत्रामधील कौशल्य आत्मसात करून भारत देशाला अग्रेसर करण्याचे आवाहन केले . तसेच हा रमजान महिना कसा पवित्र असतो हे सांगून सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी जाधव यांनी केले.