गादेगावची कु.सायली बागल डॉजबॉल स्पर्धेत भारत देशात तिसरी
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी सायली बागल हिने नुकत्याच पंजाब येथे पार पडलेल्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेमध्ये ऑल इंडिया मध्ये तृतीय क्रमांक पटकावला .याबद्दल संस्थेच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव वर्षा मोरे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे सहशिक्षक शितल मस्के, लीना बागल ,मसरुद्दीन पटेल ,सीमा रकटे ,अजय मोरे आदी उपस्थित होते नुकत्याच पार पडलेल्या पंजाब येथील स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाला बिहारच्या संघाने पराभूत करून प्रथम क्रमांक पटकावला . अतिशय अटीतटीच्या लढती यावेळी पाहायला मिळाल्या सोलापूर जिल्हा डॉजबॉल संघाचे अध्यक्ष सुदीप मालप सर, सचिव लुंगे सर त्याचबरोबर कोच फिरोज पठाण यांनी सायली बागलचे अभिनंदन केले.
यावेळी महाराष्ट्राच्या टीम मध्ये सोलापूर जिल्ह्यातून सायली बागल, शिवानी माने व प्रगती भुई यांचा समावेश करण्यात आला होता. सायली बागल च्या यशाबद्दल समस्त गादेगाव ग्रामस्थांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात होत आहे.