शिक्षक संघटनेचे नेते विष्णुपंत गावडे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित ◼️ पंढरपूर तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण ◼️ विष्णुपंत गावडे (गुरुजी ) यांच्यावर अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

शिक्षक  संघटनेचे नेते विष्णुपंत गावडे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित  ◼️ पंढरपूर तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण   ◼️ विष्णुपंत गावडे (गुरुजी ) यांच्यावर अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार पंढरपूर तालुक्यातील तनाळी येथील रहिवाशी असलेले विष्णुपंत गावडे (गुरुजी )यांना पंचायत समितीच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सध्या विष्णुपंत गावडे गुरुजी हे पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले वस्ती येथे कार्यरत असून यांना पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शैक्षणिक इतर अनेक क्षेत्रातील मंडळींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे पंढरपुर येथील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

विष्णुपंत गावडे (गुरुजी) यांना विद्यार्थी प्रती असलेली तळमळ , वाढते इंग्रजी शाळांचे पेव फुटत असताना जिप प्राथमिक शाळेतील पट नोंदणी, वृक्षारोपण ,अंधश्रद्धा निर्मूलन ,नवीन शैक्षणिक धोरण याबाबतचे शिक्षकांना मार्गदर्शन अध्यापनात विद्यार्थी केंद्रित व आनंद शिक्षण पद्धतीचा वापर, व्यसनाधीनता समाज यावर जनजागृती सामाजिक उपेक्षित घटकांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी केलेले प्रयत्न. त्याचबरोबर ते उच्च शिक्षणही घेत आहेत त्यांची देशाचे माजी केद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्र पवार यांच्या कृषी ध्येय धोरणावर आधारित पीएचडी चालू आहे .ते सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील डॉ. सुशीलकुमार शिंदे राज्यशास्त्र विभाग प्रमुख के. बी. पी कॉलेज, पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पी .एच .डी करत आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक सेवेमुळे पंढरपूर पंचायत समितीने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. यापूर्वीही त्यांना सोलापूर जिल्हा स्तरीय राष्ट्रवादी शिक्षक संघाचा व पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाचा आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते .

या कार्यक्रमाप्रसंगी माढाचे आमदार अभिजीत पाटील, सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, सभापती डॉ. शुभम आगावणे , उपसभापती प्रमोद देशमुख , पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन नितीन पाटील गुरुजी, मुक्ताप्पा श्रीराम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान चौगुले, औदुंबर पाटील ,चळे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर घाडगे व सर्व जिप . सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि तालुक्यातील शिक्षक व जिव्हाळा परिवारातील सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

त्यांच्या यशाबद्दल पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता , रासकर मॅडम, कल्याण कुंभार, हरिश्चंद्र मोरे , महेश गवळी ,शेटफळ केंद्रातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. कार्यक्रमास शिक्षक बंधू, शिक्षक भगिनी व ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.