निशिगंधा सहकारी बँकेच्या चेअरमन पदी तिसऱ्यांदा कल्याणराव काळे, व्हाईसचेअरमनपदी राजेंद्र जाधव.

निशिगंधा सहकारी बँकेच्या चेअरमन पदी तिसऱ्यांदा कल्याणराव काळे, व्हाईसचेअरमनपदी राजेंद्र जाधव.

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर  ( दै.पंढरी नगरी न्युज) पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे नेते तथा वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांची बँकेच्या चेअरमनपदी तिसऱ्यांदा तसेच व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली निशिगंधा सहकारी बँकेची निवडणूक दि.२०/२/२०२३ रोजी बिनविरोध करण्यात आली होती. आज रोजी निशिगंधा सहकारी बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती .

या बैठकीत चेअरमन पदी कल्याणराव काळे तर व्हाईसचेअरमन पदी राजेंद्र जाधव यांची सर्व संचालकाच्या सहमतीने दोघांची  नावे सुचविण्यात आली त्यास सर्वानुमते बैठकीत मान्यता देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. सी .दुरगुडेयांनी काम पाहिले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पी .बी सावंत, निशिगंधा सहकारी बँकेचे सर व्यवस्थापक कैलास शिर्के यांनी निवडणुकीसाठी मदत केली. चेअरमन,व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या चेअरमन कल्याणराव काळे, व्हॉइस चेअरमन राजेंद्र जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते बाळासाहेब काळे (गुरुजी), यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभा देवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत यलमार, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन मारुती भोसले, संचालक बिभीषण पवार, विठ्ठल चे माजी संचालक महादेव देठे, सुभाष हुंगे- पाटील , शकूर बागवान, भारत कोळेकर, तानाजी जाधव सुधाकर कवडे, राजाराम पाटील, राजाभाऊ माने , अण्णा शिंदे, इब्राहिम मुजावर, पांडुरंग कौलगे, सरपंच पांडुरंग नाईकनवरे, हनुमंत दांडगे, पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंतराव मोरे, नारायण शिंदे, रणजीत पाटील यांनी उपस्थित राहून कल्याणराव काळे व राजेंद्र पाटील यांचा सत्कार करून अभिनंदन केले.