कामदा चैत्रएकादशी दिवशी गांजाचा साठा जप्त पंढरपुरात मोठी खळबळ ◼️ पंढरपुर शहर पोलीसाची गांजा वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई , ◼️ ०४ किलो गांजा व एक कार सह ०५,७९,१२० रू किंमतीचा मुददेमाल जप्त
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज )दि. २९ रोजी चैत्रवारीचे बंदोबस्ताचे अनुशंगाने पंढरपुर शहरातील के बी पी कॉलेज चौक येथे वाहतुक महिला पोलीस अंमलदार/२१७१ गायकवाड हे वाहतुक नियमन करीत असताना एक स्विफट डिजायर कार नं एमएच १३ बीएन ४८६८ ही गाडी वेगाने आलेने त्यास गाडी थांबविणेचा इशारा केला असता सदरची गाडी नं. थांबता वेगाने सरगम चौकाकडे निघुन गेल्याने सदर गाडीचा पाठलाग केला असता सदरची कारगाडी सरगम चौकातील वाहतुकीमुळे पुढे जावु शकली नसल्याने थांबली लागलीच सदर वाहन चालकास विश्वासात घेवुन पळुन का जात होता, गाडीत काय आहे ? असे विचारता त्याने गाडीत गांजाचे ०२ पुडे असलेचे सांगीतलेने त्याचे विचारता त्याने आपले माणिक साहेबराव चौगुले रा. नारायण चिंचोली असे असलेचे सांगीतलेने त्यास गाडी व मुददेमालासह ताब्यात घेवुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप व इतर पोलीस अंमलदार यांना माहिती दिलेने सदरठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ हे गाडीजवळ जावुन आत पाहिले असता कुबट, उग्र, घाण गांजासदृश्य वास येत असलेल्या वाहनाच्या डिक्कीत ०२ सिलबंद पाकीटे मिळुन आलेने आलेने आरोपी व त्याचे स्वःताचे मालकीची पांढरे रंगाची स्विफट डिजायर कार नं एमएच १३ बीएन ४८६८ ही मुददेमालासह पुढील कार्यवाहीकरीता पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचेविरोधात पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं १६५/२०२६ एनडीपीएस कायदा कलम २० (ब)ii अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपींकडुन खालीलप्रमाणे मुददेमाल जप्त करणेत आलेला आहे.

१) ७९,१२०/- रू. अंदाजे किंमतीचा ३ किलो ९५६ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित हिरवट रंगाचा उग्र वास येणारा गांजा
२) ५,००,०००/- रू किं एक पांढरे रंगाची स्विफट डिजायर कार नं एमएच १३ बीएन ४८६८
एकुण ५,७९,१२०/- किंमतीचा मुददेमाल आरोपी व कार सह ताब्यात घेतला. सदरची उल्लेखनीय कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर
पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, प्रशांत डगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे , यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी नितीन जगताप, सपोफौ कल्याण ढवणे, पोहेकॉ/ प्रसाद औटी, रविंद्र हांगे, पोलीस नाईक सचिन इंगळे, पोकों कपिल माने, बजरंग बिचकुले, हर्षद ठाकर, दिपक नवले, रोहित टोणपे तसेच मपोका /२१७१ गायकवाड यांनी केली आहे.
सदरच्या गुन्हयाचा पुढील अधिकचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे हे करीत आहेत.