श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजा बुकिंगला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजा बुकिंगला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या चंदन उटी पूजेसाठी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सर्व पूजा अल्पावधीतच बुक झाल्या आहेत.

श्री विठ्ठलच्या चंदन उटी पूजेसाठी एकूण 48 पूजा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रति पूजेस ₹21,000 इतके देणगी शुल्क निश्चित करण्यात आले होते. भाविकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे या सर्व पूजा पूर्णपणे बुक झाल्या आहेत.

तसेच श्री रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेसाठी 46 पूजा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रति पूजेस ₹9,000 इतके देणगी शुल्क निश्चित करण्यात आले होते. या सर्व पूजा देखील पूर्णपणे बुक झाल्या आहेत.

चंदन उटी पुजा या भाविकांची गर्दी विचारात घेता चैत्री यात्रा व अधिकमास महिन्याचे दिवस वगळून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

भाविकांकडून मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने व्यवस्थापक संदेश भोसले यांनी भाविकांचे आभार मानले असून सर्व पूजाविधी नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.