पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा.... ◼️ शहर व ग्रामीण कार्यालयातील महिला पोलीस भगिनींची प्रमुख उपस्थिती

पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने   महिला दिन उत्साहात साजरा....   ◼️ शहर व ग्रामीण कार्यालयातील महिला पोलीस भगिनींची प्रमुख उपस्थिती

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या संकल्पनेतून आज पंढरपूर शहरातील व पंढरपूर तालुक्यातील सर्व महिलांना महिला पोलीस अधिकारी, महिला पोलीस अंमलदार त्यामध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन पंढरपूर शहर पोलीस स्टेशन पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवून महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान वाढावा समाजामध्ये महिला विषयी लोकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व महिला पोलीस अधिकारी, महिला पोलीस अंमलदार यांच्या वतीने महिलांना भगिनींना गुलाब पुष्प व लहान मुलींना चॉकलेट देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून पंढरपूर विभागातील पोलिसांनी महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला.

यावेळी महिला दिन कार्यक्रमासाठी पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे , पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर ,पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पंढरपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्रीमती घनवट मॅडम , महिला पी एस आय रावण ,महिला पी एस आय धडकेपाटील, महिला पी एस आय बेणेवाड मॅडम, पोलीस उपनिरीक्षक संतोष जगताप व इतर अंमलदार यांनी सहभाग नोंदवला महिला दिनानिमित्त महिला बहिणीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महिला दिनानिमित्त पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे ,पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे ,यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त करुन शुभेच्छा देण्यात दिल्या.

कार्यक्रमास शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन कार्यालयातील महिला पोलिस भगिनी व ग्रामीण भागातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार जगताप यांनी मानले.