पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीही मदतीला धावली ◼️ पुणे , माढा व बार्शी तालुक्यात पूरग्रस्त नागरिकांना श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचा मदतीचा हात.. ◼️ मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी व व्यवस्थापक यांचे जबरदस्त नियोजनामुळे पूरग्रस्तबाधित सुखावले..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पूरग्रस्तांना मदतकार्य करण्यात आले.

बार्शी तालुक्यातील भोईंजे गाव व माढा तालुक्यातील सुलतानपूर येथील सिना नदीच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी खालील मदत साहित्य सुपूर्त करण्यात आले.

500 अन्नपाकिटे, 500 लाडू प्रसाद पाकिटे, 500 पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, ही सर्व मदत सामग्री सर्कल अधिकारी शिंदे यांचेकडे सुपूर्त करण्यात आली.
महाराष्ट्रात आकस्मिक आलेल्या पुराच्या संकटात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत मानवतेच्या दृष्टीने मदतकार्य अविरतपणे सुरू आहे. सह-अध्यक्ष, मंदिरे समितीचे सदस्य व कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त बांधवांना वेळेत अन्नपाकिटे व आवश्यक साहित्य पुरविण्याचे कार्य सातत्याने राबविले जात आहे.
या वेळी सदस्य जळगावकर महाराज, सदस्या नडगिरे मॅडम, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेकाधिकारी मुकेश आनेचा यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अन्नपाकिटे व आवश्यक साहित्याची पाहणी करून पूरग्रस्त भागात पोहोचविण्याची व्यवस्था केली. सर्वांच्या अविरत प्रयत्नांमुळे पूरस्थितीत अडकलेल्या बांधवांना अन्नपाकिटे, पिण्याचे पाणी व लाडू प्रसाद वेळेवर पोहोचविण्यात आले असून, यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.