श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर नवरात्र संगीत महोत्सवाची उत्साहात सुरुवात ◼️ कलापिनी कोमकली यांनी पहिली गायनसेवेची माळ विठूमाऊली चरणी गुंफली..
------------------------------------------------------------------------------------
श्रीक्षेत्र पंढरपूर:-(दै.पंढरी नगरी न्यूज ) श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके , प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत साहेब लेखाधिकारी मुकेश आणेचा यांचे उपस्थितीत दिनांक २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर सात दिवस दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत चालू असणाऱ्या नवरात्र संगीत महोत्सवाची पहिल्या स्वर माळेची सुरुवात आंतरराष्ट्रीय किर्तीच्या तसेच कुमार गंधर्व यांच्या कन्या विदुषी कलापिनी कोमकली यांच्या स्वरांनी गुंफली.सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, शकुंतला नडगिरे मॅडम कलापिनी कोमकली,पृथ्वीराज राऊत साहेब लेखाधिकारी मुकेश आणेचा,संजय कोकीळ यांचे शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली.
सुरुवातीला कलापिनी कोमकली यांनी राग कल्याण मध्ये शिव शिव आणि तीनताला मध्ये एक मुरलीया तार दे या कुमारजींच्या बंदिशी गात अभिजात शास्त्रीय संगीताची मेजवानी देत अनेक प्रसिद्ध सगुण निर्गुण भजनांनी त्यामध्ये सुंदर ते ध्यान,हरी कहेरे गये,ब्रीज नगरी में,लक्ष्मी वल्लभा,राम निरंजन,उड जाएगा,आदी रचना गात वडील पं. कुमार गंधर्व यांच्या आठवणींना उजाळा दिला.त्यांनतर त्यांनी सुनता है गुरु ग्यानी,या रचनेने कार्यक्रमाची सांगता केली.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला श्रीधर मांढरे, हार्मोनियम स्वानंद कुलकर्णी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे यांनी करत कार्यक्रमाला रंगत आणली. सुत्रसंचनलन विक्रम बिस्किटे यांनी केले.
यावेळी पाऊस असताना सुद्धा पहिल्याच दिवशी पंढरपूर कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित प्रतिसाद दिला पुढे २९ तारखेपर्यंत चालणाऱ्या महोत्सवास उदंड प्रतिसाद देण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांचे वतीने करण्यात आले.हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समिती कर्मचारी वर्ग अधिक परिश्रम घेत आहेत.