किरणराज कांबळे याची उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया येथे निवड
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) येथील मौजे तपकिरी शेटफळ ता . पंढरपूरचे रहिवासी ,सध्या सोलापूर निरिक्षण / बालगृहात शिक्षक पदावर कार्यरत असणारे महाराष्ट्र राज्य निरिक्षणगृह / बालगृह कर्मचारी संघटनेचे सहसचिव श्री शत्रुघ्न कांबळे सर यांचे लहान चिरंजीव किरणराज शत्रुघ्न कांबळे याची उच्च शिक्षणासाठी ऑस्टेलिया येथील सेंट्रल क्वीन्सलॅन्डस विद्यापीठात मास्टर ऑफ सायंस इन कंट्रक्शन मॅनेजमेंट या २ वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने रु १२ लाख मेरिट स्कॉलरशिप मंजूर करून त्याची निवड केली असून किरणराज हा ९ सप्टेंबर २०२५ रोजी परदेशात रवाना होत आहे .
किरणराज हा मागील दोन वर्षांपासून परदेशात उच्च शिक्षण घेण्याची तयारी करीत होता इंग्लड अमेरिका ऑस्ट्रेलिया या देशातील नामवंत विद्यापीठाच्या एट्रंस परीक्षेत तो यशस्वी झाला आहे . किरणराजचे माध्यमिकशिक्षण सोलापूरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण ए . डी . जोशी कॉलेज मध्ये झाले . चंडक पॉलीटेक्नीकल येथे त्याने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवीका घेतली तर ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे स्थापत्य अभियांत्रीकी ( बी . टेक . ) पदवी संपादन केली आहे . किरणराज हा लहान पासुन जिद्दी स्वभावाचा असल्याने त्याची परदेशात उच्च शिक्षणाची जिद्द अखेर यशस्वी झाली असल्याने कांबळे परिवार व आपतेष्ठ नातेवाईक स्नेही परिवार व समाजाच्या विविध स्तरातुन किरणराजचे व कांबळे फॅमिलीचे अभिनंदन होत आहे .