मंगळवेढा तालुक्यातील जनतेची संवाद साधण्यासाठी आजपासून आमदार समाधान आवताडे यांचा दौरा जाहीर,.. मतदार राजामध्ये उत्साहाचे वातावरण

मंगळवेढा तालुक्यातील जनतेची संवाद साधण्यासाठी आजपासून आमदार समाधान आवताडे यांचा दौरा जाहीर,.. मतदार राजामध्ये उत्साहाचे वातावरण

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे हे मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडी -अडचणी सोडवण्याकरिता थेट त्यांच्याशी संवाद साधून आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती संपर्क कार्यालयातून देण्यात आली, आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघात विकासाचा ध्यास घेऊन गावोगावी,  वाडी ,वस्तीवरील गोरगरीब नागरिकांचा विकास करण्यासाठी शासन दरबारी सतत प्रयत्न करून आपल्या मतदार राजासाठी  निधी खेचून आणण्यात ते राज्यात अव्वल १. नंबरचे आमदार असल्याचे नागरिकांमधून चर्चा होत आहे .त्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी गुरुवार दि.६ .जुलै पासून "आमदार आपल्या दारी, हा उपक्रम राबविण्यात आला आहे. सध्या मंगळवेढा तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती झाली आहे, तालुक्यात पाणी- चारा टंचाई हे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्याकरिता  आपल्या गावातील असलेल्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावरती उपाय योजना करण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन विविध प्रश्न मार्गी लावण्या करिता सर्व विभागाचे शासकीय अधिकारी तसेच प्रमुख पदाधिकारी यांचे समवेत येणार आहे .तरी गावातील नागरिक शेतकरी कार्यकर्ते बंधू-भगिनी यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे आमदार समाधान आवताडे यांचा गाव भेट दौरा खालील प्रमाणे - गुरुवार  दि. ६ जुलै रोजी 
-----------------------------------------------------------------------------------
पाटकळ ,जुनोनी, नंदेश्वर भोसे ,ममदाबाद, लोणार ,पडोळकरवाडी, रेवेवाडी ,मानेवाडी, खडकी. शुक्रवार दि.७ रोजी .-- 
-----------------------------------------------------------------------------------
हिवरगाव ,खोमनाळ ,भाळवणी, निंबोणी ,चिखली ,मारोळी, शिरनांदगी ,रड्डे ,सिद्धगिरी ,जाहिल्याळ, हाजापूर, डोंगरगाव,शुक्रवार दि.८ जुलै रोजी -----------------------------------------------------------------------------------

येड्राव, खवे ,बावची, जंगलगी ,सरगरबुद्रुक ,लवंगी, आसबेवाडी ,शिवनगी ,सोडडी.रविवार दि.९ जुलै रोजी -- 

-----------------------------------------------------------------------------------
फटेवाडी ,तळसंगी ,मरवडे, बालाजीनगर ,कात्राळ, कर्जाळ ,कागष्ट, डिस्कळ, माळेवाडी ,पौट ,येळगी, हुलजंती इत्यादी गावातील नागरिकांच्या विविध अडीअडचणी सोडवण्यासाठी पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे नागरिकांशी संवाद साधणार आहेत .तरी ग्रामस्थांची निवेदने, अर्ज स्वीकारण्यात येतील वेळेवर त्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार आवताडे यांनी केले आहे.