आज मारापुर येथे महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा व विविध स्पर्धाचे विशेष आयोजन..
---------------------------------------------------------------------------------
मारापुर ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा पुढाकार
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्युज ) : मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथील ग्रामपंचायतच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायत माजी सरपंच रोहिणी ताई यादव यांनी दिली. नारी तु महान, विश्वाची आहेस शान. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील माता-भगिनीचा गौरव सन्मान सोहळा आज बुधवार दिनांक ८ मार्च २०२३रोजी शरदचंद्र कृषी विद्यालय मारापूरच्या भव्य प्रांगणामध्ये सकाळी ११ .वाजता आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून यशोदा महिला पतसंस्थेच्या चेअरमन नीलाताई आटकळे तर अध्यक्षस्थानी मारापूरच्या माजी सरपंच सौ. रोहिणीताई यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यामध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये प्रामुख्याने १) वकृत्व स्पर्धा २) संगीत खुर्ची ३) रांगोळी स्पर्धा ४) उखाणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. वकृत्व, संगीत, खुर्ची, रांगोळी स्पर्धा आणि उखाणे स्पर्धा मधील सहभागी होणाऱ्या महिलेस महिला दिनानिमित्त प्रत्येक स्पर्धेत तीन पारितोषिक दिली जातील. सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. साळसकर मॅडम उपस्थित राहणार आहेत आणि प्रत्येक स्पर्धेमधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक येणाऱ्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रमुख सूचना या स्पर्धेमध्ये लहान गट आणि मोठा गट असे गट पाडण्यात येणार आहेत. तरी या मेळाव्यासाठी मारापुर परिसरातील सर्व महिला भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन मारापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. सुवर्णा आसबे यांनी केले आहे.