पंढरपूरात गजानन महाराज चौकात वाहतुकीची मोठी कोंडी , वाहतुक नियमाचे तीन- तेरा वाजले..

पंढरपूरात गजानन महाराज चौकात वाहतुकीची मोठी कोंडी , वाहतुक नियमाचे तीन- तेरा वाजले..

◼️भाविक- भक्तांची वाहतूक शाखेविषयी कमालीची नाराजी, वाहतूक शाखेचा भोंगळ कारभार उघड..

◼️रिक्षा वाहतूक जोमात तर वाहतूक शाखा कोमात ..

पुत्रदा एकादशी निमित्त 1 लाख भाविकांनी घेतले विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन.
------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै .पंढरी नगरी न्यूज) सबंध महाराष्ट्राचे व इतर राज्यातील भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या आज पुत्रदा एकादशी सोहळ्या निमित्त दर्शनासाठी पंढरपुर शहरात पायी चालत आलेल्या लाखो भाविक भक्तांना गजानन महाराज येथील चौकात रिक्षा वाहतूक चालकांनी वाहतुकीचे सर्व नियम बाजूला सारून वाहतुकीची कोंडी केल्याने  येथील वाहतूक काही काळ ठप्प झाल्याने  वाहतुकीचा भाविकांना प्रचंड मनस्ताप व फटका बसल्याने  वाहतूक शाखा प्रशासनाविषयी तीव्र व्यक्त होत आहे.आज मंगळवार दि .5 रोजी लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र व बाहेर राज्यातून सुमारे 1 लाख भाविक दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होऊन सावळ्या विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले. पुत्रदा एकादशी असल्यामुळे पंढरपुरात दर्शनासाठी भाविक भक्तांची  मोठी गर्दी झाली होती श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीने पुत्रदा एकादशी निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची कोणतीही  गैरसोय, गडबड होऊ नये तसेच भावी भक्तांचे दर्शन व्यवस्थित पार पाडावे यासाठी  मंदिर समितीच्या वतीने विशेष काळजी घेतल्याचे दिसून आले. 
------------------------------------------------------------------------------------

◼️पंढरपूर शहर पोलीस स्टेशनची  वाहतूक शाखा कोमात
पुत्रदा एकादशी निमित्त आज पंढरपुरात सुमारे एक लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्याकरता गर्दी केली होती परंतु पंढरपुरातील नेहमी वर्दळ असलेल्या गजानन महाराज चौकात वाहतूक शाखेचे पोलीस आपल्या कर्तव्यावर नसल्याने रिक्षा चालकानी वाहतुकीचे सर्व नियम बाजूला सारून वाहतुकीची प्रचंड कोंडी केल्यामुळे भाविक भक्तांना या त्रासाला सामोरे जावे लागल्यामुळे भाविकांना कोंडीचा याचा फटका बसल्यामुळे भाविकांमध्ये वाहतूक पोलीस प्रशासनाविषयी नाराजी पसरली आहे. या गजानन महाराज या चौकात नेहमीच रिक्षा वाहतूक चालक ही आपली रिक्षा काही ठिकाणी रस्त्यावर  आपली वाहने उभी करत असल्याचे वारंवार दिसत असल्याने त्याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे तर काही रिक्षा वाहतूक चालक प्रवाशांना याविषयी उलट सुलट बोलल्याचे परिसरात चर्चा होत आहे गजानन महाराज चौकातील रिक्षाचालकांना विषयी वारंवार तोंडी सांगून ऐकत नसून रिक्षा चालक हे आपली वाहने रस्त्यावर मन मानेल तसे उभे करत असल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे या भागातील स्थानिक नागरिकांतून शहर पोलीस वाहतूक शाखे विषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे .तरी पंढरपूर शहरातील व बाहेरून आलेल्या भाविकांना गजानन महाराज चौकातून येण्या -जाण्याकरिता मध्येच उभे असलेल्या रिक्षाचालकांचा त्रास होऊ नये याकरिता पंढरपूर शहर वाहतूक शाखेचे पोलिसांकडून कायमस्वरूपी उपायोजना कराव्यात अशी जोरदार मागणी भावीकभक्त व स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.