रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज ) :- राज्याचे रोजगार हमी योजना,फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य हभप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते रोजगार हमी योजना मंत्री श्री गोगावले यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार राजू खरे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे , शिवसेनेचे नेते साईनाथ अभंगराव, संपर्क प्रमुख महेश साठे ,जिल्हाप्रमुख चरणदास चौरे यांच्यासह एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे मान्यवर ,पदाधिकारी उपस्थित होते.