कै.महादेव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा तर्फे पंढरपुरात विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन...
------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या कै. महादेव बाबुराव आवताडे प्रतिष्ठान, मंगळवेढा यांच्या वतीने पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील इ. १० ते १२ वी परीक्षामध्ये घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थिनी- विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यात आली असल्याची माहिती कै.महादेव अवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. शनिवार दि 14 रोजी दु.1/30 वा . कार्यक्रमाचे आयोजन केले त्याकरिता पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत प्रोत्साहन देण्यासाठी मंगळवेढा येथील कै. महादेव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानने हा सोहळा आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग परिवाराचे नेते तथा इटोपियन शुगर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक हे असणार आहेत तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी हे प्रमुख असणार आहेत. कै. महादेव अवताडे प्रतिष्ठान हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील यशस्वी झालेल्या गोर -गरीब, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी- विद्यार्थ्यांना तसेच सामाजिक, राजकीय ,कला क्रीडा वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक संघटना यांना प्रत्येक वर्षी प्रोत्साहन देऊन सन्मान सोहळ्याचे आयोजन करत असते या छोट्याशा झाडाचे रूपांतर आज मोठ्या वटवृक्षात झाल्याचे या सामाजिक बांधिलकी वरून स्पष्ट होत आहे. कार्यक्रमास पंढरपूरचे प्रांतधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, सोलापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप, सोलापूर प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे, पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारी, पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर ,पंढरपूर नगरपालिकेचे नूतन मुख्य अधिकारी महेश रोकडे ,पंढरपूर शहरचे आदर्श वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक ग्रामीण शिरीष दुबे, पंढरपूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे ठिकाण श्रेयस पॅलेस कार्यालय कराड रोड, पंढरपूर येथे होणार आहे. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक ,पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कै. महादेवराव अवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांनी केले आहे.