मराठा जोडो अभियान जिजाऊ रथ यात्रेचे रविवार दि. 23 मार्च रोजी पंढरपुरात आगमन.. जिजाऊ रथयात्रेच्या स्वागतासाठी समाज बांधवाकडून जय्यत तयारी

मराठा जोडो अभियान जिजाऊ रथ यात्रेचे रविवार दि. 23 मार्च रोजी पंढरपुरात आगमन..  जिजाऊ रथयात्रेच्या स्वागतासाठी समाज बांधवाकडून जय्यत तयारी

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( दैनिक, पंढरी नगरी न्यूज) मराठा सेवा संघ आयोजित मराठा जोडो अभियान जिजाऊ रथयात्रा छत्रपती शहाजी महाराज यांच्या जन्मदिनी भोसले गडी वेरूळ येथून जिजाऊ रथ यात्रेला सुरुवात झाली असून या रथ यात्रेचा रविवार दि. 23 मार्च 2025 रोजी पंढरपुरात आगमन होणार असल्याचे माहिती मराठा सेवा संघाच्या संयोजकांनी दिली.

मराठा सेवा संघ संचलित मराठा जोडो अभियान जिजाऊ रथयात्रेचे पंढरपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाल्यानंतर 23 मार्च रोजी सायंकाळी 7 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ येथे चौकात जाहीर सभा होणार आहे. जिजाऊ रथयात्रेची मोठ्या उत्साहाने स्वागताची तयारी करण्यात येणार आहे.

जिजाऊ रथयात्रेचे पंढरपूर तालुका व शहरात ठीक ठिकाणी समाज बांधवांच्या बैठका घेऊन मराठा जोडो अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. जिजाऊ रथ यात्रा 18 मार्चला छत्रपती शहाजी महाराजांच्या जन्मदिनी भोसले गडी वेरूळ इथून करण्यात आली आहे तर 1 मे महाराष्ट्र दिन पुण्यातील लाल महालात यात्रेची सांगता होणार आहे . जिजाऊ रथयात्रेची भव्य स्वागताची व सभेची तयारी करण्यासाठी मराठा सेवा ,संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सेवा संघाच्या सर्व कक्षाचे शहर व तालुक्यातील पदाधिकारी वतीने स्वागताची परिश्रम घेत आहेत.