माढ्यात विद्यमान आमदारांनी दहशतीचे राजकारण केले : अभिजीत पाटील मी आमदार झाल्यानंतर विधानसभेत पहिल्या भाषणांत मराठा आरक्षण या विषयी प्रश्न उपस्थित करणार.
◼️ पिराची कुरोली, देवडे, खेड भोसे, शेवते ,तरटगाव व पट.करोली येथे जंगी सभा संपन्न..
◼️ अभिजीत पाटलांच्या सभेला पंढरपूर तालुक्यातील 42 गावात उत्स्फूर्त प्रतिसाद.
-------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ):- माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांची रविवारी मतदार संघातील पिराची कुरोली, देवडे, खेडभोसे, शेवते, तरटगाव आणि पटवर्धन कुरोली येथे सभा पार पडली.

यावेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हलगीच्या कडकडाटासह फटाक्याच्या आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात अभिजीत पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या सभेस संबोधित करताना अनेक वकत्यांनी बोलतांना सांगितले की शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारा महाराष्ट्रातील ऐकमेव नेता म्हणजे अभिजीत आबा पाटील आहेत.