मुंबई येथील भाविक नंदिनी मथुरे यांचेकडून श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी चांदीच्या पादुका अर्पण.

मुंबई येथील भाविक नंदिनी मथुरे यांचेकडून श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी चांदीच्या पादुका अर्पण.

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी निमित्त मुंबई येथील भाविक नंदिनी अशोक मथुरे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी चांदीच्या पादुका अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. 

या पादुकाचे वजन सुमारे 4 किलो 670 ग्रॅम होत असून, रक्कम रू.425624/- इतकी किंमत होत आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिरे समितीचे वतीने विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींचा फोटो व उपरणे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी मंदिर समितीचे सराफ गणेश भणगे व देणगीदारांचे कुटुंबीय उपस्थित होते.