संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीस पंढरपूर तालुक्यातून 35000 हजार मराठा समाज बांधव सहभागी:- किरणराज घाडगे मराठा समाज बांधवाच्या सेवेसाठी विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील प्रथम
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) मराठा आरक्षणासाठी सोलापूर येथे म्हणून सरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी पंढरपूर शहर व तालुक्यातून सुमारे 35000 हजार मराठा समाज बांधव सहभागी झाले होते अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष तथा माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी दिली.

मराठा आरक्षणाच्या प्रत्येक लढाईत पंढरपूर येथील मराठा समाजाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. सोलापूर येथे झालेल्या शांतता राहिली साठी पंढरपूर तालुक्यातून सुमारे 35000 हजार समाज बांधव सहभागी झाले होते. या शांतता रॅलीत सहभागी होण्याकरता गेल्या अनेक दिवसापासून जनजागृती साठी पंढरपूर शहरातील इसबावी येथील शेखर भाऊ भोसले यांच्या जिजाऊ मंगल कार्यालयात संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण राज घाडगे व मराठा समाज समन्वयक माऊली पवार यांनी दि. ७ रोजीच्या शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी मराठा समाज बांधवाची जनजागृती करण्यासाठी मोठी बैठक घेण्यात आली होती.

सोलापूर येथे शांतता रॅलीसाठी जाण्यासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्याकडून समाज बांधवांना डिझेलची व्यवस्था करण्यात आली होती. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा युवा गर्जना संघटनेचे अध्यक्ष समाधान काळे यांनीही पंढरपूर शहर व तालुक्यात ठीक ठिकाणी बैठकी घेऊन रॅलीसाठी मराठा समाज बांधवांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. त्याचबरोबर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ यांनीही आपल्या असंख्य मराठा समाज बांधव सहकार्यासह सोलापूर येथील शांतता रॅलीत स्वयम स्फूर्तीने सहभाग घेतला होता .पंढरपूर सर्व व तालुक्यातून निघालेल्या मराठा समाज बांधवांसाठी ठिकठिकाणी चहा, पाणी, नाष्टा इत्यादी सोय पंढरपूर ते मोहोळ- सोलापूर या मार्गावरील प्रत्येक गावातील मराठा समाज बांधवांनी केली होती .