संघर्ष योद्धा मनोज जरांगे -पाटील यांच्या सोलापूर येथील मराठा आरक्षण जनजागरण रॅलीस लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा-- सकल मराठा समाज बांधव
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर येथे होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागरण रॅलीस पंढरपूर शहर व तालुक्यातील मराठा समाजातील बंधू -भगिनींनी आपल्या मुलाबाळांना आरक्षण मिळण्यासाठी, सरकारी नोकरीमध्ये संधी मिळण्यासाठी, एक वर्ष सातत्याने आंदोलन करणारे,संघर्षयोद्धा मनोज जरांगे - पाटील हे सोलापूरला येणार आहेत तरी मराठा समाजातील बांधवांनी मराठा आरक्षण जनजागरण व शांतता रॅलीत उस्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी बुधवार दि .७ ऑगस्ट २०२४ सकाळी ठीक ११:०० वाजता येत आहेत.
तरी मराठा समाजातील समाज बांधवांनी आपल्या कुटुंबासह लाखोंच्या संख्येने उपस्थिती दाखवून मराठा समाजाची ताकद दाखवावी तसेच शासनास मराठा समाजास आरक्षण देण्यास भाग पाडावे असे कळकळीचे आवाहन सकल मराठा समाज ,संभाजी ब्रिगेड संघटना पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने करण्यात येत आहे.