चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गादेगाव नगरीत वहीतुला व भव्य नागरी सत्कार, वाढदिवसानिमित्त अभिजीत पाटील समर्थकांचे शक्ती प्रदर्शन
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्युज) पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे विठ्ठल परिवार, अभिजीत आबा पाटील मित्र परिवार व ग्रामस्थांच्या वतीने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार व प्रशालेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करणार असल्याची माहिती अभिजीत पाटील भव्य नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली.
हा सत्कार सोहळा रविवार दि. 4 /8/ 2024 रोजी सायंकाळी 7 : वाजता छत्रपती शिवाजी महाराज विचार मंच या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमास गादेगाव पंचक्रोशीतील अभिजीत आबा पाटील यांच्यावर प्रेम करणारे विठ्ठल परिवारातील सभासद, शेतकरी, हितचिंतक व कार्यकर्ते यांनी भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गादेगाव ग्रामस्थांनी केले आहे.