संभाजी ब्रिगेडचे महासचिव सचिन दादा खेडेकर यांनी घेतले श्री विठ्ठल -रुक्मिणी मातेचे दर्शन , मंदिरातील कामाची केली पाहणी

संभाजी ब्रिगेडचे महासचिव सचिन दादा खेडेकर यांनी घेतले श्री विठ्ठल -रुक्मिणी मातेचे दर्शन ,   मंदिरातील कामाची केली पाहणी

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज ) संभाजी ब्रिगेडचे महासचिव सचिन दादा खेडेकर यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संभाजी ब्रिगेडची पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, तालुका अध्यक्ष बाळासाहेब बागल ,पुरुषोत्तम देशमुख ,शेखर आटकळे, पत्रकार नवनाथ खिलारे संभाजी ब्रिगेड संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे यांचे कडून माहिती सांगण्यात आली.