विठाई वारकरी गुरुकुलचे वारकरी जीवन गौरव पुरस्काराचे थाटात वितरण तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न झाला दिमाखदार सोहळा
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर येथे विठाई वारकरी गुरुकुल या गुरुकुलच्या वतीने वारकरी जीवन गौरव पुरस्काराचा वितरण समारंभ तीर्थक्षेत्र पंढरीत नुकताच संपन्न झाला. हा दिमाखदार सोहळा तपोवन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुळुज संचलित विठाई वारकरी गुरुकुल तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि सेतुबंध प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यात विठाई वारकरी जीवन गौरव, सेतुबंध साहित्य, विठाई कृषी जीवन गौरव तसेच विठाई साहित्य साधना इत्यादी पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आजरेकर आंबेकर फर परंपरेतील ह.भ.प. भागवत महाराज चवरे तर वितरणाच्या शुभप्रसंगी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, विठ्ठल परिवाराचे नेते आणि धाराशिव युनिट एक ते पाचचे कार्यकारी संचालक अमर पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, विठ्ठलचे तज्ञ संचालक प्रा. तुकाराम मस्के, सुप्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी, दिनकर दाजी चव्हाण इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले.
यावेळी ह. भ. प. चिंतामणी महाराज घोडके पांढरेवाडी तसेच ह. भ. प. कबीर फुगारे गुरुजी चळे यांना विठाई वारकरी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विठाई कृषी जीवन गौरव पुरस्कार ह.भ. प. बलभीम बापू पाटील खरसोळीकर, सेतुबंध साहित्य पुरस्कार हरिश्चंद्र पाटील, आबासाहेब पाटील, शिवाजीराव नारायणराव शिंदे, श्रीकांत पाटील, रामचंद्र इकारे इत्यादी कवी-लेखकांना प्रदान करण्यात आला. त्यासोबतच राजेश पवार, जैनुद्दीन मुलानी, शिवाजी वाघमारे यांना विठाई साहित्य साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तपोवन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुळुज संचलित विठाई वारकरी गुरुकुलचे अध्यक्ष ह.भ.प. सूर्याजी महाराज भोसले तसेच तपोवनच्या संस्थापिका अध्यक्ष ह.भ. प. माधुरी भोसले यांच्या आयोजनातून सदर कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला मारुती जाधव, सुनील अडगळे, शिवाजी भोसले, राजेश बादले पाटील महाराज, लक्ष्मण तात्या कसगावडे महाराज, रामदास स्वामी महाराज नांदेडकर, गणपती चव्हाण उमरगा, पुंडलिक अंकुशराव, शिवाजीराव बागल, शिवाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठाईचे अध्यक्ष सूर्याजी महाराज भोसले यांनी, सूत्रसंचालन समाधान काळे यांनी तर आभार तपोवनचे खजिनदार संतोष कसगावडे यांनी मानले.