न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढेचा विद्यार्थी श्रेयश इंगोले पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात १३ वा क्रमांक
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै .पंढरी नगरी न्यूज ) : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्रेयश दादासाहेब इंगोले यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत १३वा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. तो न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढाचा विद्यार्थी आहे.
चि. श्रेयश याला इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत २९८ पैकी २६२गुण मिळाले त्याला वर्गशिक्षक व्ही. डी. माने, मुख्याध्यापक रवींद्र काशीद सर, शिवलिंग राऊत, वीरेंद्र राक्षे, अशोक आवताडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी मिळवलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील विद्यार्थी शिक्षकाकडून व मारापुर पंचकोशीतून श्रेयस इंगोले सर्वत्र कौतुक होत आहे .
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान दादा आवताडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुजित कदम, मारापुर चे सरपंच विनायक यादव, उपसरपंच अशोक आसबे, युवा उद्योजक राजकुमार यादव, तावशीचे सरपंच पप्पू यादव, शिक्षक नेते ज्योतीराम बोंगे, जिल्हा पतसंस्थेचे संचालक संजय चेळेकर,जुनोनी माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष महादेव जाधव, मुख्याध्यापक व सर्व स्टाफ बाळासाहेब जतकर, नागेश आनेराव, प्रकाश जाधव, नंदकुमार गोसावी, सुहास मासाळ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.