करमाळ्याचे भोंदू (बाबा) मनोहर उर्फ मामा भोसले व त्याचा साक्षीदार विशाल वाघमारे यांचेविरुद्ध आणखी एक गुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल.

करमाळ्याचे भोंदू (बाबा) मनोहर उर्फ मामा भोसले व त्याचा साक्षीदार विशाल वाघमारे यांचेविरुद्ध आणखी एक गुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल.


--------------------------------------------------------------------------
सोलापूर ,(दै.पंढरी नगरी न्यूज):-करमाळा पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण येथे गुन्हा रनिस्टर क्रमांक ९१७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८ (४), ३ (५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व नादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम,

२०१३ चे कलम ३(१), ३(३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील फिर्यादी विशाल जयसिंग मस्के, वय ५० वर्षे, व्यवसाय कन्स्ट्रक्शन, रा. अनाजी वस्ती, मांजरी, ता. हवेली, नि. पुणे हे बांधकाम व्यवसायीक असून ते कुटुंबासह मांजरी, पुणे येथे राहतात. फिर्यादी हे त्यांची मुलगी शर्वरी हिचे वय २८ वर्षे हिचे भविष्याबाबत व विवाहाबाबत माहिती माणून घेण्याच्या उददेशाने त्यांचे नातेवाईकांकडुन मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मनोहर मामा भोसले यांचे कडे गेले होते. त्यावेळी आरोपीने त्याचे मठातील काम पाहणारा आरोपी विशाल वाघमारे याचे मार्फतीने फिर्यादीकडुन रु ५०००/ रू घेतले व नंतर त्यांचे मुलीचे लग्न होईल व फिर्यादी यांची पत्नी उपसरपंच होईल असे सांगितीले होते. व त्याकरीता फिर्यादीला प्रत्येक अमवस्येला असे पाच वेळा मौजे उंदरगाव येथे आपल्या मठामध्ये येण्यास सांगितले त्यानंतर फिर्यादी हे अमवस्येला उंदरगाव मठामध्ये गेले असता आरोपी मनोहर भोसले याने त्यांना मी बाळुमामाचा अवतार असुन माझेमध्ये दैवी शक्ती आहे व त्या दैवी शक्तीचा वापर करून फिर्यादी यांचे पत्नीला उपसरपंच करण्यासाठी मठामध्ये पुना करावी लागेल असे सांगुन आरोपीने फिर्यादीकडुन १,००,०००/रुपये घेतले आहेत व आरोपीने फिर्यादी यांना तुमच्या नावची पुजा केली आहे आता काही अडचण येणार नाही असे फिर्यादी यांना सांगितले.

त्यानंतर आरोपी यांनी त्यांचे मुलांचे शिक्षणासाठी मांजरी येथे राहायचे आहे असे सांगुन फिर्यादी यांचा मांजरी परीसरामध्ये साईबालाजी बिल्डींगमधील दोन फ्लॅट भाडयाने घेतले होते परंतु दोन्ही फ्लॅटचे मासिक भाडे १२,०००/रू याप्रमाणे व डिपोझिट म्हणून २०,०००/रू ठरलेले असताना एकुण ६३ महिन्यांचे आहे व डिपॉझिटची रक्कम फिर्यादी यांना दिली नाही.

आरोपीने त्याचे साथिदारासह तो बाळु मामाचा अवतार असुन त्याचे कडील दैवी शक्तीचा वापर करून फिर्यादीस मुलीच्या विवाहाबाबत माहिती देणे व पत्नीला उपसरपंच करण्यासाठी पुना करणेचे सांगुन व फिर्यादी यांचे फ्लॅटच्या भाडे व डिपॉझिटच्या व्यवहारांमधुन फिर्यादी यांची एकुण ८,६१,०००/रूपयाची फसवणुक केलेली आहे.

आरोपी भोंदुबाबा मनोहर उर्फ मामा भोसले व त्याचा साथिदार विशाल उर्फ माथबाबा वाघमारे यांचे टोळीविरूध्द अलीकडेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अतर्गत देखिल कार्यवाही करण्यात आलेली आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी  अंजना कृष्णा व्ही. एस., करमाळा पोलीस ठाणे पोलीस

निरीक्षक,  रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक बालाजी वळसने हे करीत आहेत.

नागरिकांना अवाहन यापुढेही कोणी अशा प्रकारे अघोरी पुनेच्या माध्यमातुन जनतेची फसवणुक करीत असल्यास त्यांनी पोलीसांकडे संपर्क करण्याचे अवाहन अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापुर ग्रामीण यांनी केले आहे.