नवरात्र महोत्सव सांगता नवान्न पोर्णिमा श्री. विठ्ठल व रूक्मिणी मातेस पारंपारिक पोशाखासह सह अलंकार परिधान
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) श्री. विठ्ठल व रूक्मिणी मातेस नवान्न पोर्णिमा निमित्त पारंपारिक पोशाखासह सह अलंकार परिधान आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठलास सोने मुकुट, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी २ पदरी, शिरपेच मोठा १० लोलक, मस्त्य जोड, लक्ष्मी पेंडल लॉकेट, तोडे जोड, पदकासह लॉकेट, तांदळ्या ७ पदरी, तुळशीची माल १ पदरी, पुतळ्याची माळ, शाळीग्राम हार, हायकोल, सोन्याचा करदोडा इत्यादि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तारवाड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमानी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आलेले होते,
मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सदस्य महोदय व लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाची सांगता उत्साहात व भक्तिभावात पार पडल्याचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगितले.