भीमा नदीवरील चळे गावात जुगार - मटका अवैद्य व्यवसाय मालकावर पोलिसांची मोठी कारवाई ◼️ सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या कारवाईत, १ लाख ५६ हजार २४७ रू. चा मुद्देमाल जप्त " ◼️ ग्रामीण भागातही चालणाऱ्या अवैद्य व्यवसायाकडे पोलीस प्रशासनाची करडी नजर ..,या कारवाईमुळे व्यवसाय करणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले ◼️ चळे बीट पोलीसाचा अवैद्य व्यवसाय चालकांना आशीर्वाद असल्याची नागरिकांमधून चर्चा..

------------------------------------------------------------------------------------

 पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील चळे येथे दि. ०६/१०/२०२५ रोजी प्रशांत डगळे साो, सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.), पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार मौजे चळे गावात शिवाजी पवार ऑनलाईन सर्व्हिसेस नावाचे गाळयामध्ये एजंट शिवाजी नागनाथ पवार हा लोकांकडून पैसे लावून कल्याण मटका या नावाने संभाव्य येणाऱ्या अंक आकडयावर मटका घेत असताना पोलीस पथकाने छापा मारला. छापा कारवाईत इसमनामे १) शिवाजी नागनाथ पवार, वय ३२ वर्षे (एजंट), २) दिनकर गोविंद मोरे, वय ६५ वर्षे, ३) मच्छिंद्र नामदेव कांवळे वय ६० वर्षे, ४) काकासाहेब गजानन चौगुले वय ४९ वर्षे, ५) पंढरीनाथ नागनाथ कदम वय ५२ वर्षे, ६) रामकृष्ण विठोबा शिखरे, वय ७३ वर्षे, ७) रामभाऊ सिध्देश्वर मोरे, वय ३० वर्षे सर्व रा. रा. चळे, ता. पंढरपूर, ८) नितीन मच्छिंद्र शिंदे, वय ४० वर्षे, ९) नासिर महम्मद शेख वय ५० वर्षे, दोघे रा. आंबे, ता. पंढरपूर असे मिळून आले. त्यांचे कब्जात ९५,०७७/- रोख रक्कम, ०६ मोवाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण १,५६,२४७-०० रू. किंमतीचा मुददेमाल मिळून आला. म्हणून पोकॉ/१४२३ राहुल हनुमंत लोंढे यांनी एजंट शिवाजी नागनाथ पवार, बुकी मालक कल्याण भोसले रा. सरकोली आणि वर नमूद इतर ०८ इसमांविरूध्द सरकारतर्फे मु.जू.अॅ.क.१२ (अ) प्रमाणे फिर्याद दिलेली आहे.

सदरची कारवाई प्रशांत डगळे , सहाय्यक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोना/४२७ शिंदे, पोकों/२११० हुलजंती, पोकॉ/१४२३ लोंढे, सपोफौ जनार्धन करे, पोहेकॉ/१७९२ दिपक भोसले आणि पोकों/२०२० संजय गुटाळ यांनी पार पाडलेली आहे.