पंढरपूर बाजार समितीला उत्कृष्ट बाजार समितीचा वसंतदादा पाटील राज्यस्तरीय स्मृति पुरस्कार प्रदान ◼️ पंढरपूर बाजार समितीने पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक व युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट नियोजन करून विकास करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच हा राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार मिळाला :- सभापती ,हरिष दादा गायकवाड.
------------------------------------------------------------------------------------
पुणे (दै.पंढरी नगरी न्यूज ) महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे वतीने यंदाचा सन -2025 करिता देण्यात येणारा वसंतरावदादा पाटील राज्यस्तरीय स्मृति पुरस्कार पंढरपूर बाजार समितीला मिळाला आहे सभापती हरीषदादा गायकवाड, उपसभापती राजू गावडे यांच्या उपस्थितीत पुणे येथील विशेष कार्यक्रमात उपस्थित राहून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी राज्यातील 305 बाजार समितीचे मूल्यांकन करण्यात आले होते .पंढरपूर बाजार समितीने पंढरपूरच्या आषाढी यात्रा एकादशी यात्रा सोहळ्या दिवशी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी मेळाव्यास तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती याच कामाची दखल घेऊन यामधून उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणारी बाजार समिती म्हणून पंढरपूरच्या बाजार समितीची एकमताने निवड करण्यात आली.
पुणे येथील महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने राज्यातील बाजार समितीमधील विविध उपक्रम कामकाज सोयी सुविधा व आर्थिक निषेच्या आधारे राज्यातील सुमारे 300 हून अधिक बाजार समितीचे मूल्यांकन करण्यात आले होते यामध्ये पंढरपूर बाजार समिती पात्र ठरले आहे .बाजार समिती संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुरस्काराचे मोठ्या उत्साहात वितरण करण्यात आले .यावेळी बाजार समिती संघाचे सभापती प्रवीणकुमार नाहाटा ,उपसभापती संतोष सोमवंशी तसेच पंढरपूर बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ सचिव कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.