पंढरपुर शहरातील शरीराविषयी गन्हे करणा-या दोन टोळीतील ०७ सराईत गुन्हेगार सोलापुर जिल्हयातुन हददपार..

पंढरपुर शहरातील शरीराविषयी गन्हे करणा-या दोन टोळीतील ०७ सराईत गुन्हेगार सोलापुर जिल्हयातुन हददपार..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीतील शरीराविषयी गुन्हेगारी टोळी नं १ मधील सराईत गुन्हेगार नामे १) शुभम किशोर लखेरी रा. विणे गल्ली, पंढरपुर ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी प्रमुख) २) दिनेश वासुदेव गोमासे, रा. कासारगल्ली, पंढरपुर ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य ३) ईसा हारूण शेख रा. सहकार चौक, पंढरपुर ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य ४) यश अनिल चव्हाण रा. ठाकरे चौक, पंढरपुर ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) तसेच टोळी नं २ यातील सराईत गुन्हेगार नामे १) प्रविण उर्फ तात्या देविदास शिंदे रा. डोंबे गल्ली, पंढरपुर ता. पंढरपुर (टोळी प्रमुख) २) शहाजी देविदास शिंदे रा. डोंबे गल्ली, पंढरपुर ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य ३) विशाल देविदास शिंदे रा. डोंबे गल्ली, पंढरपुर ता. पंढरपुर जिल्हा सोलापुर (टोळी सदस्य) यांचेविरूध्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी वरील टोळीतील ०७ हददपार इसमांवर प्रस्ताव तयार करून हददपारीचे कारवाईबाबत अहवाल सादर केला होता.

डॉ. अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर उपविभाग, पंढरपुर यांनी सदर हददपार करणेच्या संदर्भातील कामकाज चालवुन सदरबाबतचा सविस्तर अहवाल अतुल कुलकर्णी , पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचेकडे सादर केला होता त्या अनुशंगाने टोळी नं ०१ यांना ०६ महिने तर टोळी नं ०२ यांना ०१ महिने कालावधीकरीता संपुर्ण सोलापूर जिल्हयातुन हददपार करण्यात आले असून सदरची नोटीस ही हददपार इसम यांना ताब्यात घेवून बजावण्यात आली आहे.

सदरची कामगीरी ही डॉ. अर्जुन भोसले , उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, पंढरपूर व विश्वजीत घोडके , पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोफौ. कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे, सिरमा गोडसे, शिवाजी पाटील, प्रसाद औटी, सचिन हेंबाडे, विठठल विभुते, शहाजी मंडले, कपिल माने, समाधान माने, बजरंग बिचुकले, निलेश कांबळे, धनाजी मुटकुळे, दिपक नवले, अनिस शेख तसेच रतन जाधव यांनी केली आहे.