तुंगत येथे महामार्गावर दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढिग ◼️ चकाचक पालखी मार्गावर घाणीचे साम्राज्य शासनाचा आरोग्य विभागच आजारी,.. ◼️ पंढरीला विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे आरोग्य धोक्यात ,.. ◼️ आरोग्य खात्याचा गलथान कारभार भाविकांमध्ये तीव्र नाराजी- आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी डोळे असून आंधळे..
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ): राज्याची दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरी नगरीत भरणाऱ्या प्रमुख चार यात्रांसाठी महाराष्ट्रासह पर राज्यातून व- परदेशी पाहुणेही येत असतात. पंढरपूरच्या बाजुने सर्वच महामार्गावरून मोठ्या भक्ती-भावाने वारकरी विठ्ठल पालखी सोहळे घेऊन दर्शनासाठी येतात येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने चकाचक आणि प्रशस्त असे पालखी महामार्गाची बांधणी केली असाच मोहोळ-पंढरपूर-माळशिरस हा महामार्ग प्रशस्त झाला असली तरी महामार्गावर असणारे गावांमधुन या चकाचक रस्त्याची दयनीय अवस्था केली जात असल्याने स्थानिक गावकारभारऱ्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया वाहनधारक व्यक्त करीत आहेत.

मोहोळ-पंढरपूर या पालखी महामार्गावर तुंगत याठिकाणी मुख्य वाहतुक हि बोगद्यातून होत असल्पाने तुंगत गाव रस्त्याचे दोन्ही बाजुला विभागले आहे. गावांतर्गत नागरिकांना वरच्या बाजुने वाहतुकीसाठी सर्विस रस्ता तयार केला आहे. मात्र रत्या कडेला राहणाऱ्या नागरिकांना आपल्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून लोक-जागृती मोहिम राबविणे आवश्यक आहे. माझा गाव ,सुंदर गाव हि संकल्पना फक्त कागदोपत्री राबवुन चालणार नाही तर पर्यायाने गावच्या सुंदरतेला बाधा आणणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मोहिम राबविणे गरजेचे आहे.
आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. राज्यातील विविध भागाच्या कानाकोपऱ्यातून संताच्या पालखी सोहळे या महामार्गावरून जातात ,मात्र तुंगत याठिकाणी बोगद्याचे वरील बाजुने राहणाऱ्या रहिवाशांनी आपल्या घरातील कचरा चकाचक असलेल्या महामार्गावर टाकुन जणु काही भाविकांचे स्वागतच या दुर्गंधीने करीत असल्याचा प्रकार घडत आहे. महामार्गावरून जाणारे वाहनधारकांना या दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढिगाऱ्यामुळे त्रास सहन करावा लागत असुन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने रहिवाशांसाठी कचरा विल्हेवाट कशी आणि कोठे लावयची याबाबत जागृती मोहिम हाती घेणे आवश्यक आहे. पर्यायाने जे नागरिक रस्त्याचे विद्रूपीकरण करतात त्यांचेवर कारवाई करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. पंढरपूरला पायी चालत येणाऱ्या टाळकरी, वारकरी ,फडकरी व सोहळे प्रमुख यांना दुर्गंधीचा वास सहन करावा लागत असल्याने आरोग्य खात्याबातत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.