पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्यावतीने 65 एकरा वरील मैदानात स्वच्छता मोहीम ◼️ जेसीबीच्या साह्याने काटेरी झाडाझुडपे काढून केली संपूर्ण स्वच्छता, पालख्यांची या ठिकाणी मुक्कामाची सोय होणार ◼️ वाहनधारक व भाविक भक्तांकडून संबंधित पोलीस बांधवांचे होत आहे कौतुक, ◼️ पंढरपूरला यात्रेनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेणार :-- वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर

पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्यावतीने 65  एकरा वरील मैदानात स्वच्छता मोहीम   ◼️ जेसीबीच्या साह्याने काटेरी झाडाझुडपे काढून केली संपूर्ण स्वच्छता, पालख्यांची या ठिकाणी मुक्कामाची सोय होणार  ◼️ वाहनधारक व भाविक भक्तांकडून संबंधित पोलीस बांधवांचे होत आहे कौतुक,  ◼️ पंढरपूरला यात्रेनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेणार :-- वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या विठुरायाच्या भावी भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन व त्यांच्या टीमने पंढरपूर शहर व परिसरात सध्या काटेरी बाभळीचे झाडे- झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून या काटेरी बाभळीचा त्रास वाहनधारक व वारकरी बांधवांना होऊ नये म्हणून पंढरपूर पोलीस स्टेशन व त्यांचे सहकारी यांच्या वतीने वारकरी येणाऱ्या रहदारीवर मोठ्या प्रमाणात असलेली काटेरी बाभळीचे झाडे -झुडपे जेसीबीच्या साह्याने मुळासकट काढून त्या ठिकाणी संपूर्णपणे स्वच्छता होत असल्यामुळे वारकरी व वाहनचालक यांच्यामधून पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पंढरपूर येथील आषाढी यंदा मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांच्या उपस्थित भक्तीचा जनसमुदाय मोठ्या प्रमाणात भरणार असून यात्रा भरती वेळी पंढरपुरामध्ये लाखो भाविक भक्तांची गर्दी होत असल्यामुळे गर्दीचा तान प्रशासनावर येत असतो त्यामुळे पंढरपुरात वारकऱ्यांना व भावी भक्तांना विठुरायाचे दर्शन सुलभ पद्धतीने घेता यावे या दृष्टीने प्रशासन नगरपालिका व महसूल विभाग यांच्या वतीने आषाढी यात्रेचे नेटके नियोजन करण्यासाठी नदीपलीकडील 65 एकरावर भाविक भक्तांना व येणाऱ्या वारकऱ्यांच्या पालख्या सोहळे येथे विसावण्यासाठी 65 एकरावरील मैदानाचा उपयोग होत आहे.

त्यामुळे पंढरपुरात वारकरी व पालख्यांची गर्दी होत नसते . आगामी आषाढी वारीच्या अनुषंगाने नदी पलीकडील 65 एकर व समोरील बाजूला नवीन पूल जुना दगडी पूल याच्या बाजूला असलेली काटेरी बाभळीची झाडे दगडी पुलाच्या बाजूला असलेल्या इस्कॉन घाटापाशी असलेली सर्व काटेरी बाभळीचे झाडे - झुडपे जेसीबीच्या साह्याने पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर हे सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः स्टाफच्या मदतीने जेसीबीच्या साह्याने सर्व बाभळीच्या वाढलेल्या झाडी काढून घेण्याचे काम प्रथम प्राधान्याने मागील तीन - चार दिवसापासून चालू आहे त्यामुळे संपूर्ण दगडी फुलाच्या बाजूचा व त्याचप्रमाणे नवीन पुलाच्या बाजूचा परिसर काटेरी बाभळीचे झाडे काढल्यामुळे सर्व पलीकडची बाजू पुलावरून देखील स्पष्ट दिसत आहे. पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने पालखी मार्गावरील सर्वच काटेरी बाभळीची काटेरी झाडे जेसीबी मशीनच्या सहाय्याने मुळासकट काढण्यात येत असून वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी सोय होत असल्याने पालखी सोहळे या ठिकाणी विसरणार आहेत .या कामगिरीबद्दल पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर व त्यांचे सहकारी प्रशासनाचे वारकरी, टाळकरी, फडकरी व पालखी सोहळे प्रमुख यांचे कडून निश्चितच कौतुक होत आहे.