तुळजापूर नगरपरिषदेचे नूतन मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे यांचा प्रमोद पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार
-----------------------------------------------------------------------------------
तुळजापूर (दैनिक, पंढरी नगरी न्यूज) तुळजापूर नगरपरिषदेचे नूतन मुख्यअधिकारी म्हणून अजिंक्य रणदिवे यांची नुकतीच नियुक्ती झालेबद्दल तुळजापूर नगर वासियांच्या यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
24 मार्च रोजी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन नगरपालिकेचे सूत्र हाती घेतले. नूतन मुख्यअधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी तुळजापूर नगरपरिषदेच्या कामकाजाचा नुकताच पदभार घेतल्यानंतर सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालयातील अधिकारी प्रमोद उर्फ बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ ,फेटा देऊन जंगी सत्कार करण्यात आला. नूतन मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे हे माढा तालुक्यातील संत सावता माळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष हरिदास रणदिवे सर यांचे ते सुपुत्र आहेत. तुळजापूर नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना देशमुख, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोठेवार, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार पवार, आदर्श ग्रंथमित्र कुंडलिक मोरे (सोलापूर ),सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालयातील निरीक्षक प्रदीप गाडे, निरीक्षक संजय ढेरे ,महाराष्ट्र ग्रंथालय संघटनेचे कार्यवाह गुलाबराव पाटील, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह साहेबराव शिंदे, ग्रंथालय संघाचे माजी संचालक ज्योतीराम गायकवाड, मंगळवेढ्यातील संजय- सविता सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सिद्धेवाडी ( ता. पंढरपूर )अध्यक्ष तानाजी जाधव यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन करून पुढील कामास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्कार समारंभास जगदीश कुतवळ, मुख्याध्यापक अविनाश गव्हाणे , रत्नदीप भोसले, राणा माने, विजय जाधव इ. नगर परिषदेतील कर्मचारी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष अमर ताकमोगे व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजिंक्य रणदिवे २०१६ च्या बॅचचे नगरपालिका मुख्याधिकारी असून त्यांनी आजपर्यंत शिरूर अनंतपाळ, चाकूर,औसा,हिमायतनगर व राजगुरुनगर या ठिकाणी आदर्श मुख्याधिकारी म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे.
राजगुरुनगर येथून पदोन्नतीने मुख्याधिकारी वर्ग - १ म्हणून त्यांची तुळजापूर नगर परिषदेमध्ये पदोन्नतीने बदली झाली आहे. वयाच्या २२ व्या वर्षी अजिंक्य रणदिवे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले असून नगरपालिका मुख्याधिकारी बनले आहेत. अजिंक्य रणदिवे यांनी वक्तृत्व स्पर्धांमध्ये शालेय,जिल्हा,राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक वेळा प्रथम क्रमांक मिळवलेले आहेत.ते धनुर्विद्या या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी आज पर्यंत सात वेळा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे व या खेळात भारतात द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले आहेत.
शहराच्या विकासाला प्राधान्य देणे आणि नागरिकांच्या अडचणी ऐकून त्या दूर करणे यामध्ये अजिंक्य रणदिवे यांचा हातखंडा आहे. अजिंक्य रणदिवे यांचे प्राथमिक शिक्षण अरणच्या जिल्हा परिषद शाळेत तसेच माध्यमिक शिक्षण संत सावता माळी विद्यालय,अरण ता. माढा, व महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर महाविद्यालय,सोलापूर व फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे झालेले आहे.