भोसे येथील प्रसिद्ध गंगावेस थंडाई हाऊस ज्यूस सेंटरचा शुभारंभ
------------------------------------------------------------------------------------
खेडभोसे ( दैनिक,पंढरी नगरी न्यूज ) थंडाई म्हणजे व्यायाम करणाऱ्यांसाठी अमृत मानले जाते, शरीरातील उष्णता कमी करून शरीराला आवश्यक प्रोटीन, फायबर, कैल्शियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतात, त्यामुळे थंडाईचे सेवन आरोग्यास उपयुक्त असल्याचे प्रतिपादन युवक नेते यशवंत संजयमामा शिंदे यांनी केले.
भोसे (ता. पंढरपूर) येथे गंगावेस थंडाई ज्यूस सेंटर चे उद्घाटन शिंदे आणि सरपंच गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कालिदास साळुंखे, अशोक पवार, पोलीस पाटील संतोष कोरके, माजी उपसरपंच दिलीप पवार, सुरेश पवार, सिध्देश्वर पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. शिंदे म्हणाले की, सध्याच्या फास्टफूडच्या जमान्यात केशव पवार यांनी सुरू केलेल्या थंडाईचे महत्व खूप आहे. आरोग्यास घातक शीतपेय पिण्यापेक्षा आरोग्यवर्धक थंडाई घेतल्यास आपली तब्येत नक्कीच सुधारणार आहे. तसेच शरीरातील थकवा नाहीसा होतो. व्यायाम केल्यानंतर थंडाई पिल्यामुळे शरीर स्वस्थ होते.
यावेळी बोलताना गणेश पाटील म्हणाले की, पैलवानांना तब्येतीची आणि आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते, त्यादृष्टीने सुरू केलेल्या या उपक्रमाला भोसे परिसरातून नक्कीच प्रतिसाद लाभेल. पैलवानांबरोबरच सर्वसामान्य ग्राहकांनीही या आरोग्यवर्धक पेयाचा आस्वाद घेतला पाहिजे.
या कार्यक्रमासाठी नूतन सहाय्यक अभियंता (महापारेषण) अरुण पवार, बाळासाहेब पवार, प्रवीण पवार, केशव पवार, नितीन पवार, सचिन मोरे यांच्यासह भोसे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंडू पवार यांनी केले. आभार सिध्देश्वर पवार यांनी मानले.